शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची तिसरी लाट, सर्वांचे लसीकरण... आरोग्यमंत्री मनसुख मंडावियांना 'या' आव्हानांवर मात करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 09:45 IST

Corona Virus : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्यासमोर आणखी एक आव्हान म्हणजे कोरोना संक्रमणाची गती थांबवणे आहे. देशातील काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही खूपच जास्त आहे. 

नवी दिल्ली : मनसुख मंडाविया (Mansuskh Mandaviya) यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. गुजरातच्या सौराष्ट्रमधील भाजपा नेते मनसुख मंडाविया यांनी डॉ हर्षवर्धन यांची जागा घेतली आहे. देशातील कोरोना संकटामुळे  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महत्त्व सध्या बरेच वाढले आहे. 

पदभार स्वीकारताच मनसुख मांडविया यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे, ते म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट रोखणे. दरम्यान, या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मात्र, यासाठी मनसुख मांडविया यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील. यादरम्यान, त्यांना केवळ लस पुरवठा वाढविता येणार नाही तर लस केंद्रांची संख्याही वाढवावी लागेल. 

विशेषत: देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात त्यांना लसी वेळेवर पोहोचण्याची खात्री करावी लागेल. देशातील बर्‍याच क्षेत्रातील लोकांच्या मनात या लसीबाबत अजूनही संशय आहे. लसीकरण मोहिमेतील प्रचाराच्या माध्यमातून हा संशय सरकारला दूर करावा लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्यासमोर आणखी एक आव्हान म्हणजे कोरोना संक्रमणाची गती थांबवणे आहे. देशातील काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही खूपच जास्त आहे. 

राजस्थान, केरळ, मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. केरळमध्ये गेल्या 10 दिवसात कोरोनाचे 12 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. याचबरोबर, मनसुख  मंडाविया यांना रसायन व खते मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे. कोरोनामुळे देखील हे एक अतिशय महत्त्वाचे मंत्रालय आहे. औषधनिर्माण विभाग देखील या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे त्यांना औषधे व लसींच्या निर्मितीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

कोरोनात सत्कार समारंभ टाळा, लगेचच कामाला लागा - नरेंद्र मोदी कोरोनाच्या काळात सत्कार आणि सोहळे यांना फाटे द्या. जनतेत जा. त्यांचे प्रश्न समजून घ्या. सोशल मीडिया वा एकूणच माध्यमे यांना मुलाखती टाळा. मात्र घेतलेल्या निर्णयांची नीट माहिती द्या, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आधी कॅबिनेट मंत्री व नंतर राज्यमंत्री यांची बैठक घेतली. त्यावेळी नव्या मंत्र्यांनी आठवड्याचे पाच दिवस दिल्लीत थांबून आपापल्या मंत्रालयाचा, कामाचा अभ्यास करावा. अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी, पण त्यांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहू नका, अशा सूचना मोदींनी सर्व मंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार