शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : ६३ दिवसांनी रुग्णांची संख्या १ लाखांच्या आत; ८६ हजार ४९८ नव्या रुग्णांची नाेंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 05:47 IST

Corona Virus :मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात ८६ हजार ४९८ नव्या काेराेना रुग्णांची नाेंद झाली आहे. तर २१२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असताना एक चांगली बातमी आहे. देशातील दरराेज आढळणाऱ्या नव्या रुग्णाच्या संख्येत माेठी घट झाली आहे. तब्बल ६३ दिवसांनी एक लाखांच्या आत नवे रुग्ण आढळले आहेत.

मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात ८६ हजार ४९८ नव्या काेराेना रुग्णांची नाेंद झाली आहे. तर २१२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत १७ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली हाेती. त्यानंतर ४ एप्रिलला नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा १ लाखांच्या वर गेला. तेव्हापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत हाेती.

देशात ५ मे रेाजी प्रथमच ४ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले हाेते. तर ८ मेपासून दैनंदीन रुग्णसंख्येत घट हाेण्यास सुरूवात झाली. तब्बल ६३ दिवसांनी नव्या रुग्णांचा आकडा एक लाखांच्या खाली आला असून हा ६६ दिवसांचा निचांकी आकडा आहे.  देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. दिवसभरात ९७ हजार ९०७ रुग्ण बरे झाले आहेत. 

परदेशात जायचे आहे; २८ दिवसांनी दुसरा डोस-    केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी गाईडलाईन जारी केली आहे. यानुसार ज्याला परदेशात जायचे आहे त्याला पहिल्या डोसच्या २८ दिवसांनंतर कधीही कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येईल. - गाईडलाईन असे म्हणते की, परदेशात जाण्यासाठी केवळ कोविशिल्ड लस घेतलेल्यांनाच लसीकरण प्रमाणपत्र पासपोर्ट क्रमांकाच्या उल्लेखासह देण्यात येईल. यासाठी भारताची दुसरी लस कोव्हॅक्सिन क्वालिफाय करत नाही.

विशेष श्रेणीतील लोकांनाच सूट ही गाईडलाईन केवळ, १८ वर्षांवरील आणि ३१ ऑगस्टपर्यंत परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठीच जारी करण्यात आलेली आहे. यात शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी परदेशात जाणारे लोक, टोकियो ऑलिम्पिक्स गेम्समध्ये सहभागी असलेले विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या स्टाफचा समावेश असेल.

लसीकरणाला वेगआतापर्यंत २३ काेटी ६१ लाखांहून अधिक डाेस देण्यात आले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये ३३ लाख ६४ हजार ४७६ डाेस देण्यात आले. त्यापैकी ३० लाख ३८ हजार २८९ जणांनी पहिला तर ३ लाख २६ हजार १८७ जणांनी दुसरा डाेस घेतला. आतापर्यंत १८ काेटी ९५ लाख ९५ हजार जणांना पहिला तर ४ काेटी ६६ लाख नागरिकांना दाेन्ही डाेस देण्यात आले आहेत. मे महिन्यात सरासरी १७ ते १८ लाख डाेस दरराेज देण्यात येत हाेते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस