शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

Corona Virus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 289 प्रवाशांनी भरलेल्या कोची-दुबई विमानात शिरला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 11:39 IST

कोची येथून दुबईला जाणाऱ्या एका विमानात 289 प्रवासी प्रवास करत होते. त्याचदरम्यान विमानात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं समोर आलं.

कोच्चीः जगभरासह भारतातही कोरोनानं हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 वर गेली असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळून आला होता. त्यामुळे केरळ विमानतळावरही रुग्णांची बारकाईनं तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे रविवारी एका विमानात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. कोची येथून दुबईला जाणाऱ्या एका विमानात 289 प्रवासी प्रवास करत होते. त्याचदरम्यान विमानात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं समोर आलं. त्यानंतर लागलीच विमान रिकामी करण्यात आलं. तसेच सर्व विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'

कोरोनाची लागण झालेला संबंधित नागरिक ब्रिटनचा रहिवासी आहे. कोच्ची इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, विमानात चढलेला प्रवासी गेल्या काही दिवसांपूर्वी 19 लोकांच्या समूहातील एक होता, तो मुन्नारमध्ये एन्जॉय करण्यासाठी आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर मुन्नारमध्ये उपचार सुरू होते. पण तिथल्या सुविधांना कंटाळून रुग्णाने तेथून पळ काढला होता. दुबईमार्गे तो ब्रिटनला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच या विमानात आला. केरळमधील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं त्या रुग्णाचा माग काढला असून, त्याला पकडून पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. पण त्याच्या या कृत्यामुळं आता 289 जणांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.  तर गेल्या काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कोरोन पॉझिटिव्ह असलेला तरुण एका मॉलमध्ये जाऊन आल्याची माहिती समोर आली होती. त्रिशूरमधल्या एका मॉलला भेट देऊन त्या तरुणानं सिनेमाही पाहिला. तसेच त्यानं एका साखरपुड्याच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. जवळपास 350 जण त्या तरुणाच्या संपर्कात आल्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळं केरळ सरकारची आरोग्य यंत्रणा हादरली आहे. संबंधित तरुणाच्या चुलत भावाच्या आठ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळं त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय.

कधीच सुधरू शकत नाही पाकिस्तान, कोरोनासंदर्भातील सार्क देशांच्या बैठकीत उचलला काश्मीरचा मुद्दा

Coronavirus : 'कोरोनावाला बाबा'ला पोलिसांनी केली अटक; 11 रुपयांत विकत होता कोरोना ठीक करण्याचं तावीज

Corona Virus: मुख्यमंत्र्यांनी 'कोरोना'वरचं औषध सुचवलं; विरोधकांनी सुनावलं!

टॅग्स :corona virusकोरोनाKeralaकेरळ