शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: कोरोना व्हायरसने घेतला देशात पहिला बळी; 76 वर्षीय इसमाचा कर्नाटकात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 06:38 IST

Corona Virus: चाचणी केल्यानंतर 76 वर्षांच्या मोहम्मद सिद्दिकी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

बंगळुरु - चीनसह जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फैलाव भारतातही सुरु झाला आहे. 70 हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र कर्नाटकातील कलबुर्गी येथील 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना देशात घडली आहे. मोहम्मद हुसैन सिद्दिकी असं या मृतकाचं नाव आहे. 

मोहम्मद हुसैन सिद्दिकी नावाच्या या व्यक्तीचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला असावा अशी शंका आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थित केली आहे. मोहम्मद यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचं आढळून आलं होतं. मात्र अद्याप केंद्रीय आरोग्य विभागाकडून मोहम्मद यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.  

कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, चाचणी केल्यानंतर 76 वर्षांच्या मोहम्मद सिद्दिकी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या व्यक्तिच्या संपर्कात अन्य कोण आले होते का? याचा शोध घेणं सुरु आहे. याशिवाय सिद्दिकीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तेलंगणा सरकारलाही देण्यात आली आहे. सिद्दीकी हे तेलंगणाच्या रुग्णालयात उपचारासाठी गेले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

भारतात कोरोना रुग्णांची संख्या 76 वर भारतातील सात राज्यांत कोरोना विषाणूची लागण झाल्याची प्रकरणं दिवसेंदिवस समोर येत आहेत. गुरुवारी देशात कोरोना लागण झालेल्या लोकांची संख्या 76 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 16 नवीन प्रकरणांपैकी 11 महाराष्ट्रातील नोंदवले गेले आहेत, तर दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एक नोंद झाली आहे. एका परदेशी नागरिकालादेखील कोरोना संक्रमित झाल्याचं आढळलं आहे.

जगभरात आतापर्यंत 4600 मृत्यू कोरोनाने जगभरात कमीतकमी 4,600 लोकांचा बळी घेतला आहे आणि सुमारे 1,25,293 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोना व्हायरसला सामोरे जाण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना घाबरू नका असं आवाहन केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाKarnatakकर्नाटक