शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: चिंताजनक! कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत भारत ५ व्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 15:26 IST

तसेच, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीतील कोरोनाच्या नव्या रुग्णांची आठवड्याची सरासरी भारतापेक्षा कमी आहे. तर चीनमध्ये १७ एप्रिलनंतर फक्त १२९ बाधित आढळले आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे जगभरात सुमारे ४०० कोटी लोक घरीच आहेत. तसेच, अनेक देश कोरोनावर मात करण्यासाठी औषध शोधण्याचे काम करत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याच देशाला यश मिळाले नाही. भारतात सुद्घा कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कुठेही कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे भारतासाठी आगामी काळ हा चिंताजनक ठरू शकतो. 

 

जगभरातील देशांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत १५ व्या स्थानी आहे, मात्र रोजच्या रुग्णांच्या बाबतीत ५ सर्वाधिक गंभीर स्थिती असलेल्या देशात आपला समावेश झाला आहे. ३ मे रोजी लॉकडाऊनचे ४० दिवस झाल्यानंतर भारतात सलग तीन दिवस अनुक्रमे ४२३९, ३३१८, ३०७४ रुग्ण आढळले. जगात फक्त अमेरिका, ब्राझिल, रशिया, पेरू या देशात भारतापेक्षा जास्त रुग्ण आढळले. रोजच्या मृत्यूंच्या बाबतीत भारत जगातील सर्वात वाईट स्थितीच्या ८ देशांत आला आहे. तसेच, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीतील कोरोनाच्या नव्या रुग्णांची आठवड्याची सरासरी भारतापेक्षा कमी आहे. तर चीनमध्ये १७ एप्रिलनंतर फक्त १२९ बाधित आढळले आहेत.

दरम्यान, भारतात कोरोना बाधितांचा आकडा  ५२ हजार २४७ झाला आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊनचे सक्तीने पालन करावे असे, सरकारकडून वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही ठिकाणी लॉकडाऊन पाळला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांचा थोडासा हलगर्जीपणा देशाला कोरोनाच्या भीषण संकटाकडे नेणारा ठरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या