शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : खुशखबर ! गेल्या 5 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या, लसीकरणानंही वेग घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 17:05 IST

Corona virus : देशातील लसीकरणाचा वेग वाढला असून गेल्या 24 तासांत 44,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,16,80,626 पर्यंत पोहोचली आहे.

ठळक मुद्देगेल्या 24 तासांत 25,072 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 155 दिवसांतील हा सर्वात कमी रुग्णसंख्या असलेला आकडा आहे. त्यामुळे, कोरोनापासून हा मोठा दिलासा असल्याचं दिसून येतं. देशातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या केवळ 1.03 टक्के एवढी आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होऊ लागला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आल्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यात, आनंदाची बाब म्हणजे देशातील एकूण लसीकरणाचा आकडा 58.25 कोटीपर्यंत पोहोचला आहे. लसीकरण प्रक्रिया गतीमान झाली असून एक्टीव्ह रुग्णांचा आकडाही कमी झाला आहे.  

देशातील लसीकरणाचा वेग वाढला असून गेल्या 24 तासांत 44,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,16,80,626 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, देशातील रिकव्हरी रेट 97.63 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च 2020 नंतर हा सर्वाधिक आकडा आहे.   तसेच गेल्या 57 दिवसांत सातत्याने 50 हजारपेक्षा कमी रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. गेल्या 24 तासांत 25,072 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 155 दिवसांतील हा सर्वात कमी रुग्णसंख्या असलेला आकडा आहे. त्यामुळे, कोरोनापासून हा मोठा दिलासा असल्याचं दिसून येतं. देशातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या केवळ 1.03 टक्के एवढी आहे. 

कोरोना संक्रमणाचा वेग कमी

ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लाट टोक गाठेल अशी भीती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलचा अंदाज संस्थेनं अहवालातून वर्तवला आहे. याआधी कानपूर आयआयटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री प्रा. मणींद्र अग्रवाल यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर असल्याचं म्हटलं. लसीकरणाचा वेग वाढल्यानं तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. यापुढे कोरोना संक्रमणाचा वेग कमी कमी होत जाईल, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

तिसरी लाट येण्याची शक्यता कमी

ऑक्टोबरमध्ये देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १५ हजारांच्या आसपास असेल, असं आयआयटीचं सर्वेक्षण सांगतं. कोरोना रुग्णांच्या संख्येचा अभ्यास करून अग्रवाल यांनी याआधी अनेकदा सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेबद्दलचा त्यांचा अंदाज बऱ्याच अंशी खरा ठरला होता. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता जवळपास शून्य असल्याचं अग्रवाल यांनी अहवालात म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशातील सक्रिय रुग्णांची संख्या अतिशय कमी होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य