शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण, लखनऊमधील प्रकार; ३ ठिकाणी परिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 19:09 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडालेला असताना काही दिवसांपूर्वी हवेत कोरोना विषाणूचं अस्तित्व असल्याचा दावा करण्यात आला होता.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडालेला असताना काही दिवसांपूर्वी हवेत कोरोना विषाणूचं अस्तित्व असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याला शास्त्रज्ञांनी पूर्णपणे नकार दिला होता. आता लखनऊमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून कोरोना संदर्भातील चिंता वाढण्याची शक्यता आहे. लखनऊमध्ये सांडपाण्याचं परिक्षण केलं असता त्यात कोरोना विषाणूंचं अस्तित्व असल्याचं समोर आलं आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

पीजीआय मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएमआर-डब्ल्यूएचओद्वारे देशात सांडपाण्याच्या नमुन्यांचं परिक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली. यात उत्तर प्रदेशातील सांडपाण्याचेही नमून घेण्यात आले. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. यात लखनऊ येथील परिक्षणामध्ये सांडपाण्यात कोरोना विषाणूंचं अस्तित्व आढळून आलं आहे. 

लखनऊमध्ये तीन ठिकाणी सांडपाण्याचं परिक्षणलखनऊमध्ये एकूण तीन ठिकाणी सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यात रुकपूर, घंटाघर आणि तिसरी मोहाल येथील नमून घेण्यात आले होते. यातील रुकपूर येथील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश सापडला आहे. दरम्यान, ही माहिती अतिशय प्राथमिक स्वरुपातील असून यावर आणखी अभ्यास होणं शिल्लक असल्याचंही डॉ. घोषाल यांनी सांगितलं आहे.

पाण्यातून संसर्ग होऊ शकतो की नाही हा अभ्यासाचा मुद्दा आहे. त्यावर नक्कीच अभ्यास केला जाईल. दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोनामुळे मृत्यू झालेले मृतदेह पाण्यात सोडून देण्यात असल्याचीही प्रकरणं पुढे आली होती. त्यातूनच पाण्यात कोरोना विषाणू पसरला गेलाय का याचीही पडताळणी होणं अद्याप शिल्लक आहे. भविष्यात संपूर्ण प्रदेशासाठी एक प्रोजेक्ट स्वरुपात माहिती गोळा केली जाऊ शकते, असंही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसlucknow-pcलखनऊ