शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पत्रकारांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांचे अर्थसाह्य, ‘लोकमत’चे एस. के. गुप्तांच्या कुटुंबाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 06:10 IST

Journalist: कोरोना महामारीसारखे गंभीर संकट आणि दुर्घटनांत जीव गमवावा लागलेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच-पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल. 

नवी दिल्ली : कोरोना महामारीसारखे गंभीर संकट आणि दुर्घटनांत जीव गमवावा लागलेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच-पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार पत्रकारांचा मृत्यू कोरोना, रस्ता अपघात किंवा इतर दुर्घटनेत किंवा इतर गंभीर आजाराने झाला असून, त्यात कोरोना संक्रमणामुळे मरण पावलेले ‘लोकमत’चे एस. के. गुप्ता यांचाही समावेश आहे. तीन पत्रकार प्रदीर्घ काळपासून शारीरिक अक्षमतेमुळे अंथरुणाला खिळून असल्यामुळे हे अर्थसाह्य मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण निधीतून दिले जाईल.मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या पत्रकार कल्याण योजना समितीच्या बैठकीत ही रक्कम मंजूर केली गेली. खरे यांनी सांगितले की, ‘कोरोनाची परिस्थिती पाहता यापुढे दर गुरुवारी समितीची बैठक होईल. अगदी एक प्रकरण असेल तरी त्यावर विचार होईल.’  समितीत सहा पत्रकार व मंत्रालयाचे तीन अधिकारी आहेत. या आधी मंत्रालयाने वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या ३९ पत्रकारांच्या कुटुंबियांना पाच-पाच लाख रुपयांचे साह्य दिले होते. समितीतील पत्रकार सदस्यांनी मंत्रालयाला अर्थसाह्याची रक्कम वाढवून द्यावी आणि पत्रकारांना आजीवन सीजीएचएस कार्ड दिले जावे, अशी विनंती केली. मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी यावर विचार केला जाईल व त्यासाठी समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Journalistपत्रकारcorona virusकोरोना वायरस बातम्या