शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

CoronaVirus : सरकारला खरच लशीची आवश्यकता आहे का? की...? प्रश्न विचारणाऱ्याला आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 11, 2020 17:20 IST

हषवर्धन म्हणाले, लस तयार व्हायला मोठा काळ लागतो. तसेच, लस उपलब्ध होण्यासंदर्भात कुठलीही अधिकृत तारीख सांगितलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (health minister harsh vardhan)

ठळक मुद्देलवकर लस मिळावी यासाठी, केवळ भारतच नाही, तर जगभरात सरकारी आणि खासगी भागिदाऱ्या झ्याल्या आहेत.  लशीची आवश्यकता ज्याला सर्वप्रथम असेल, त्याला ही लस सर्वप्रथम मिळेल. सरकार कोरोना लशीसंदर्भात पारदर्शक नीती तयार करत आहे.

नवी दिल्‍ली - कोरोना व्हायरसवरील लशीसंदर्भात भारत सरकार कुठल्याही प्रकारची खोटी घोषणा करत नही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. ते 'संडे संवाद' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात  आले, की 'लशीसंदर्भात सरकारने आधी 15 ऑगस्‍ट तारीख सांगितली. नंतर, 2020च्या अखेरपर्यंत येईल, असे म्हटले. सरकार अशा प्रकारच्या घोषणा लोकांना केवळ रमवण्यासाठी करत आहे का?' यावर हषवर्धन म्हणाले, लस तयार व्हायला मोठा काळ लागतो. तसेच, लस उपलब्ध होण्यासंदर्भात कुठलीही अधिकृत तारीख सांगितलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकार बिल गेट्स यांचा अजेंडा चालवत आहे का?कोरोना लस टोचण्याची सक्ती करून सरकार बिल गेट्स यांचा अजेंडा तर पुढे नेत नाही? असा प्रश्न एका व्यक्तीने हर्षवर्धन यांना विचारला. एवढेच नाही, तर सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) बिल गेट्स फाउंडेशनसोबत टाय-अप केल्यावरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. 'आपल्याकडे मृत्‍यू-दर एवढा कमी असताना, खरच सरकारला लशीची आवश्यकता आहे का? की ते केवळ बिल गेट्स यांचा अजेंडाचा चालवत आहेत?' असा सवालही त्या व्यक्तीने केला. यावर उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाले, 'केवळ प्रभावी लसच एखाद्या आजाराला रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. यामुळे लवकर लस मिळावी यासाठी, केवळ भारतच नाही, तर जगभरात सरकारी आणि खासगी भागिदाऱ्या झ्याल्या आहेत. 

हर्षवर्धन यांच्या मतदार संघातील कोलांना मिळणार प्राधान्य?यावेळी एक व्यक्ती रोशन सिंह यांनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना प्रश्न केला, की त्यांच्या मतदारसंघातील लोकांना लस देण्यात प्राधान्य दिले जाईल? यावर हर्षवर्धन म्हणाले, मी केवळ माझ्या मतदारसंघाचाच आरोग्यमंत्री नाही, तर देशाचा आरोग्यमंत्री आहे. मी स्पष्ट करतो, की सरकार यासंदर्भात पारदर्शक नीती तयार करत आहे. या लशीची आवश्यकता ज्याला सर्वप्रथम असेल, त्याला ही लस सर्वप्रथम मिळेल. मग तो माझ्या मतदारसंघातील असो अथवा नसो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmedicineऔषधं