शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

कोरोना वेगाने वाढतोय, 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 16:51 IST

corona virus : डब्ल्यूएचओनेही (WHO) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे.

Corona Virus Marathi News ) :  नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा सुरू झाला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे दोन वर्षांपूर्वीच्या भयानक दृश्याच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 752 नवीन रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओनेही (WHO) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे.

WHO च्या म्हणण्यानुसार, गेल्या चार आठवड्यात जगभरात कोरोना प्रकरणांची संख्या 52 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत 8 लाख 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत मृत्यूंच्या संख्येत 8 टक्क्यांनी घट झाली असून 3 हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. जागतिक स्तरावर 1600 हून अधिक रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. WHO नेही सातत्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. WHO सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यासोबतच डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, वाढत्या केसेस पाहता खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. सिंगापूरमध्ये सर्वात गंभीर परिस्थिती आहे. याठिकाणी कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. त्यामुळेच सिंगापूरमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. लोकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच इंडोनेशिया आणि मलेशियामध्येही कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.

भारतात गेल्या 24 तासांत 752 नवीन रुग्ण भारतात सुद्धा कोरोनाची प्रकरणे वाढताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 752 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 3420 झाली आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये दोन तर राजस्थान आणि कर्नाटकात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. याठिकाणी कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत