शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: कोरोनाच्या संकटातून बाहेर येत आहेत हे देश, भारताचा देखील आहे समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 15:34 IST

अनेक ठिकाणी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. अशा देशांमधील अनेक शहरांमध्ये आता एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जगभरातील निम्मी लोकसंख्या घरात कैद आहेत. या दरम्यान काही देशांत लॉकडाऊन शिथिल केले जात आहे. सर्वत्रच कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. असेही काही देश आहेत जे आता हळूहळू कोरोना संकटातून बाहेर येत आहेत. आनंदाची बाब म्हणजे यात भारताचा देखील समावेश आहे. काही देशांमध्ये आता लॉकडाऊन काढले  गेले आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. अशा  देशांमधील अनेक शहरांमध्ये आता एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. 

दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये लॉकडाऊन काढले गेले आहे. तेथील शासनाकडून ऑफिस आणि हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी काही नियमही लागू करण्यात आले आहेत. मास्क आणि  सोशल डिन्स्टसिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

व्हिएतनाममध्ये गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. त्यामुळे तिथले लॉकडाऊन हटवले गेले आहे. शाळा आणि कॉलेजदेखील सुरू झाले असून, विद्यार्थ्यांची स्क्रीनिंगदेखील केली जात आहे. स्क्रीनिंग केल्यानंतर त्यांना प्रवेश देणे बंधनकारक असणार आहे.

मलेशियामध्ये अनेक व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. इराणमध्ये देखील असेच काहीसे चित्र आहे. त्यामुळे तेथील धार्मिक स्थळं आता खुली करण्यात आली आहेत. कोरोनामुळे आता तिथल्या मृत्यूंच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे तेथील मशीद आता पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रमजानसारख्या पवित्र महिन्यात मशीद सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

स्पेनमध्ये ४ मेपासून पब्लिक टान्सपोर्ट सुरू करण्यात आले आहेत. प्रवास करताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. स्पेनमध्ये ४८ दिवस लॉकडाऊन होते. स्पेनमधील आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार १८ मार्चनंतर कोरोना रुग्ण्यांच्या मृत्यूमध्ये घट झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इटलीमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते. ९ आठवडे इटली लॉकडाऊन होते. आता हळूहळू इटलीची परिस्थितीदेखील पूर्वपदावर येत आहे. तर जर्मनीमध्ये शाळा कॉलेजप्रमाणे सलून आणि काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या