शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

सप्टेंबरपासून सुरू होणार Zydus च्या लसीचा पुरवठा; MD शर्विल पटेल यांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 5:26 PM

पटेल म्हणाले, सरकारला लसींचा पुरवठा केला जाईल. यानंतर मुलांच्या लसीकरणाची योजना कशी असेल, याचा निर्णय सरकारवर अवलंबून राहील.

नवी दिल्ली - झायडस कॅडिलाने मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे. यानंतर, आज झायडस ग्रुपचे एमडी डॉ. शर्विल पटेल यांनी ZyCOV-D चा पुरवठा आणि किंमत यांसंदर्भात अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केले. सध्या आम्ही लसींचे उत्पादन कमी प्रमाणावर करत आहोत. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत लसीच्या पुरवठ्याला सुरुवात होईल, अशी आशा आहे. तसेच, ऑक्टोबरपर्यंत आमच्याकडे एका महिन्यात 10 कोटी लसी तयार करण्याची क्षमता असेल, असे पटेल यांनी म्हटले आहे. (Corona virus zycov-d vaccine supply to start in september says md dr sharvil patel)

पटेल म्हणाले, सरकारला लसींचा पुरवठा केला जाईल. यानंतर मुलांच्या लसीकरणाची योजना कशी असेल, याचा निर्णय सरकारवर अवलंबून राहील. मुलांना या लसीचे एकूण तीन डोस दिले जातील आणि डोस सेमच राहतील. आम्ही अर्जदारांचा ओपनिंग स्टॉक सुरक्षित केला आहे. यूएसनेही लसीची मागणी केली आहे. मुलांसाठीची ही भारतातील पहिलीच लस आहे. 

तुम्ही घेताय ती लस अस्सल आहे ना?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ही लस सुई मुक्त असणार आहे. आणि हिच्यासाठी सुरक्षा अॅपचा वापर केला जाईल. लॅन्सेटच्या जरनलमध्ये या लसीचा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रिझल्ट पब्लिश करण्यात आला आहे. साइड इफेक्टच्या दृष्टीने कुठल्याही विषयावर बंदी घातलेली नाही. दुसऱ्या डोसनंतर गंभीर संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचे दिसून आलेले नाही. याच बरोबर, 50 हून अधिक क्लिनिकल साइट्समध्ये अध्ययन करण्यात आले आहे. ही लस 25 डिग्री तापमानावर तीन महिने स्टोर केली जाऊ शकते. 

दरवर्षी 10 ते 12 कोटी लसी तयार करण्याचा प्लॅन -पटेल म्हणाले, कंपनी दरवर्षी 10 ते 12 कोटी डोस तयार करण्याचा प्लॅन करत आहे. नवे प्लांट पूर्णपणे काम करत आहेत. ही लस निडल फ्री असेल आणि जगातील अशी पहिलीच लस असेल. या लसीच्या अभ्यासात 1400 किशोरवयीन मुलांचा समावेश करण्यात आला होता. या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनी आणि तिसरा डोस 56 दिवसांनी घ्यावा लागेल. याच बरोबर या लसीमुळे ट्रिपॅनोफोबिया म्हणजेच सुई आणि रक्ताची भीतीही असणार नाही. संपूर्ण लसीकरण कार्यक्रम दोन महिन्यांत पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. 

‘स्पुतनिक लाइट’, एकच डोस पुरून उरणार

दुसऱ्या लसीवरही काम सुरू -पटेल म्हणाले, आम्ही दोन डोस वाल्या लसीवरही काम करत आहोत. लसीच्या किंमतीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, एका महिन्यात लसीची किंमत निश्चित केली जाईल. लसीचा सर्वाधिक भाग सरकारला दिला जाईल. सरकारसोबत लसीची किंमत आणि मात्रा यासंदर्भात चर्चा होणे अद्याप बाकी आहे. महिनाभरात यासंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या