शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Corona Virus:कोरोना निर्बंध अजून महिनाभर, ३१ डिसेंबरपर्यंत प्रतिबंध कायम; संसदेत आज होणार ‘ओमायक्राॅन’वर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 06:51 IST

Corona Virus: काेराेना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनची वर्गवारी ‘अतिशय धोकादायक’ अशी करण्यात आली आहे. या व्हेरिएंटची संसर्गक्षमता कैकपटींनी असल्याने केंद्र सरकारने सध्याच्या काेराेना प्रतिबंधक नियमांना ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : काेराेना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनची वर्गवारी ‘अतिशय धोकादायक’ अशी करण्यात आली आहे. या व्हेरिएंटची संसर्गक्षमता कैकपटींनी असल्याने केंद्र सरकारने सध्याच्या काेराेना प्रतिबंधक नियमांना ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लाेकसभेमध्ये ओमायक्राॅनबाबत उद्या, बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे.ओमायक्राॅन व्हेरिएंट अतिशय धाेकादायक असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेने म्हटले आहे. यासंबंधी आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेतली. त्यात त्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना केल्या. केंद्राने  २५ नाेव्हेंबरला ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर केली हाेती. त्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

भारतात 'ओमायक्रॉन' चा शिरकाव नाहीदक्षिण आफ्रिकेतून येत असलेल्या प्रवाशांमुळे भारतात 'ओमायक्रॉन' चा शिरकाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतात मात्र आतापर्यंत ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही. - डॉ. मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री

आयडेंटिफायरकडे यंत्रणांनी लक्ष ठेवावे प्रयाेगशाळांनी स्मार्ट वर्क केल्यास ओमायक्राॅनची ओळख पटविता येईल. स्पाइक प्राेटिनमध्ये नसलेल्या आयडेंटिफायरकडे लक्ष ठेवत असे नमुने जनुकीय तपासणीसाठी नाेंदवून सरकारला माहिती द्यावी. - डॉ. रमण गंगाखेडकर, माजी प्रमुख, आयसीएमआर साथरोग विभाग 

आरटी-पीसीआरद्वारे ओळख पटविणे शक्यnआरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे ओमायक्राॅन व्हेरिएंट ओळखता येणे शक्य असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेने म्हटले आहे.nत्यामुळे वेळेवर निदान करण्याच्या दृष्टीने हा एक माेठा दिलासा आहे. nसध्या करण्यात येत असलेल्या काही आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे ओमायक्राॅनचा संसर्ग ओळखता येऊ शकताे.nतर काही चाचण्यांद्वारे ओमायक्राॅनच्या संसर्गाची शक्यता व्यक्त करता येऊ शकते. nओमायक्राॅनच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

अशी पटेल ओळख?nआरटी-पीसीआर चाचणीद्वारे मानवी शरीरात दाेन किंवा अधिक विषाणूंच्या जनुकीय आयडेंटिफायरचे अस्तित्व तपासण्यात येते. nएक आयडेंटिफायरमध्ये बदल झालेला असल्यास दुसऱ्या आयडेंटिफायरचा अहवाल पाॅझिटिव्ह येताे. nबहुतांश चाचण्यांमध्ये काेराेना विषाणूच्या स्पाईक प्राेटीन आयडेंटिफायर तपासण्यात येताे. nएखाद्या विशिष्ट भागातील विषाणूचे आयडेंटिफायर चाचणीत आढळले आणि स्पाइक प्रोटिनमध्ये आयडेंटिफायर न आढळल्यास संबंधित व्यक्तीला ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याची शक्यता असू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत