शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Fake Corona Vaccine: बनावट कोरोना लस बनवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, वाराणसीतून 5 आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 13:26 IST

Fake Corona Vaccine: वाराणसी एसटीएफने बनावट लस आणि टेस्टींग किटसह 4 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाराणसी: वाराणसीमध्ये कोरोनाची बनावट लस आणि चाचणी किट बनवून देशाच्या इतर राज्यांना पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. बुधवारी, यूपी-एसटीएफच्या वाराणसी युनिटने लंका पोलिस स्टेशन अंतर्गत रोहित नगरमधील एका घरावर छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. 

5 आरोपी अटकेतपोलिसांनी याप्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे. तसेच, पोलिसांनी आरोपींकडून Coveshield आणि Zycov-d च्या बनावट लसी, बनावट चाचणी किट, पॅकिंग मशीन, रिकाम्या कुपी आणि स्वॅब स्टिक जप्त केल्या आहेत. एसटीएफचे अतिरिक्त एसपी विनोद कुमार सिंह यांनी सांगितले की, सिद्धगिरी बागेतील धनश्री कॉम्प्लेक्समधील राकेश थवानी, बौलिया लहरतारा येथील अरुणेश विश्वकर्मा, पठाणी टोला चौकातील संदीप शर्मा, बलिया जिल्ह्यातील नागपुर रसडा येथील समशेर आणि नवीन मालवीय नगर येथील लक्ष्य अशी आरोपींची नावे आहेत. 

4 कोटींचा मुद्देमाल जप्तपोलिसांनी सध्या सर्व आरोपींची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट बनावट लस आणि टेस्ट किट बनवून दिल्लीमार्गे दक्षिण भारतातील अनेक राज्यांना पुरवठा करत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या सर्व वस्तुंची अंदाजे किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे.

असे करायचे कामएसटीएफच्या चौकशीत राकेश थवानीने सांगितले की, तो संदीप शर्मा, अरुणेश विश्वकर्मा आणि समशेर यांच्यासोबत बनावट लसी आणि टेस्टिंग किट बनवण्याचे काम करत होता. तो ही बनावट लस आणि किट आरोपी लक्ष्य जावा याला पुरवायचा. लक्ष्य त्याच्या नेटवर्कद्वारे या बनावट लसी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुरवत असे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसVaranasiवाराणसीPoliceपोलिस