शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: सतर्क होण्याची वेळ, कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशात १०९ दिवसांनंतर प्रचंड रुग्णवाढ, सापडले ७९६ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:38 IST

Corona Virus: जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली काढल्यानंतर  गेल्या काही महिन्यांमध्ये देशात कोरोनामुक्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र भारतात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे.

जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली काढल्यानंतर  गेल्या काही महिन्यांमध्ये देशात कोरोनामुक्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र भारतात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. काल देशात एका दिवसात कोरोनाचे ७९६ नवे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४६ लाख ९३ हजार ५०६ एवढी झाली आहे. तर भारतामध्ये सध्या कोरोनाचे ५ हजार २६ सक्रिय रुग्ण आहेत. जहळपास १०९ दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटक, पुदुच्चेरी आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ५ लाख ३० हजार ७९५ एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार भारतामध्ये आजच्या घडीला कोरोनाचे ५ हजार २६ रुग्ण सक्रिय आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण ०.०१ टक्के एवढं आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.८० टक्के आहे. आतापर्यंत ४ कोटी, ४१ लाख, ५७ हजार ६८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे झालेला मृत्यूदर हा १.१९ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार देशामध्ये लसीकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत २२०.६४ कोटी लसी देण्यात आल्या आहेत.

देशात १६ सप्टेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णसंख्या ५० लाखांवर पोहोचली होती. तर १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोनाच्या रुग्णसंख्येने १ कोटींचा टप्पा ओलांडला होता. ४ मे २०२१ रोजी कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी तर २३ जून रोजी कोरोना रुग्ण संख्या ३ कोटी आणि २५ जानेवारी २०२२ रोजी कोरोना रुग्णसंख्येने ४ कोटींचा टप्पा ओलांडला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस