शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: परदेशात फिरायला जा अन् लस घ्या; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘लस पर्यटन’ पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:37 IST

सहल आयोजकांची शक्कल, पर्यटन व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न

मुंबई :  कोरोनामुळे ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी सहल आयोजकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. परदेशात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच सहलीचा आनंद लुटण्यासाठी विशेष पॅकेज तयार केले जात आहे. भारतीय लसीकरणातील अडथळ्यांमुळे ही योजना यशस्वी ठरेल, असा विश्वास या पर्यटन कंपन्यांना आहे.

मुंबई, दिल्ली आणि दक्षिणेकडील राज्यांतील काही कंपन्या या पॅकेजवर काम करत आहेत. दिल्लीतील एका पर्यटन कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाला भारत आणि रशियाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार २४ दिवसांच्या सहल काळात स्फुतनिक लसीचे दोन डोस पर्यटकांना घेता येतील. अलीकडेच ३० व्यक्तींची पहिली तुकडी लस पर्यटनासाठी रवाना झाली. २९ मे रोजी दुसऱ्या खेपेसाठीचे बुकिंग फुल्ल झाले आहे.दुबईत निर्बंध लागू करण्याआधी बाहेरील पर्यटकांना लसीकरणाचा लाभ घेता येत होता. शिथिलीकरणानंतर तेथे पुन्हा तशी सुविधा उपलब्ध होऊ शकेल

मुंबईस्थित एका पर्यटन कंपनीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध शिथील होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. त्यानंतर संयुक्त अरब अमेरिका आणि रशियात पर्यटनाबरोबरच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. दीड ते दोन लाखात लस पर्यटनाचा आनंद नागरिकांना घेता यावा, हा उद्देश आहे. यासंबंधीच्या आराखड्यावर काम सुरू असून, निर्बंध शिथील होताच अंमलबजावणी केली जाईल.

या पर्यायांवर चर्चा...कॅलिफोर्निया, लोवा, लुसियाना, मार्यलॅंड, नेवाडा या देशांत लसीकरणासाठी राष्ट्रीयत्त्वाचा पुरावा मागितला जात नाही. त्यामुळे येथे पर्यटकांच्या लसीकरणात फारशा अडचणी येणार नाहीत. दुबईत निर्बंध लागू करण्याआधी बाहेरील पर्यटकांना लसीकरणाचा लाभ घेता येत होता. शिथिलीकरणानंतर तेथे पुन्हा तशी सुविधा उपलब्ध होऊ शकेल. शिवाय न्युयॉर्कमध्येही लसीकरणावर फारसे निर्बंध नसल्याने या सर्व पर्यायांवर विचार सुरू असल्याचे एका खासगी पर्यटन कंपनीतील अधिकाऱ्याने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसTravel Tipsट्रॅव्हल टिप्स