शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

Corona Vaccine: कोरोनावरील लस घेतल्यानंतर २६ हजार जणांना साइड इफेक्ट, तर एवढ्या लोकांचा मृत्यू, सरकारी आकडेवारीतून माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 16:48 IST

Corona Vaccine: कोरोनावरील लस घेतल्यानंतरही काही जणांचा मृत्यू झाल्याच्या तसेच लसीचा साईड इफेक्ट झाल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान सरकारी आकडेवारीमधून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशातील कोरोनाविरोधातील लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. दरम्यान, कोरोनावरील लस घेतल्यानंतरही काही जणांचा मृत्यू झाल्याच्या तसेच लसीचा साईड इफेक्ट झाल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान सरकारी आकडेवारीमधून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार कोरोनावरील लस घेतल्यानंतर सुमारे ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार जणांना कोरोनाची लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसून आले आहेत. 

न्यूज १८ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसारीत केले आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर सुमारे २६ हजार लोकांवर साईड इफेक्ट दिसून आले आहेत. तर ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारची आकडेवारी प्रत्येक देशात जमा केले जात आहेत. त्याचा अभ्यास करून भविष्यात लसीचे साइड इफेक्ट कमी करण्यावर प्रयत्न केला जाईल. दरम्यान, आकडेवारी पाहिल्यास लसीकरणाच्या तुलनेत मृतांची संख्या कमी आहे. आतापर्यंत देशात ७ जूनपर्यंत २३.५ कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. यादरम्यान २६ हजार २०० एईएफआय प्रकरणे समोर आली आहेत. याचे टक्केवारीमध्ये आकलन केल्यास हा आकडा केवळ ०.०१ टक्के एवढाच आहे. कोरोनाची लस घेतलेल्या १० हजार व्यक्तींपैकी केवळ एका व्यक्तीवर साईड इफेक्ट दिसून आले आहेत. तर दर दहा लाखांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या दोन्ही लसींमध्ये ०.१ टक्के एईएफआय केस मिळाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते मृत्यूची संख्या आणि एइएफआयचे रुग्ण दोन्ही कमी आहेत. त्यामुळे तज्ज्ञ कोरोनावरील लस घेण्याचे आवाहन सर्वांना करत आहेत. भारतामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लस हेच प्रभावी हत्यार आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत