शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: सीरमची कोवोवॅक्स जूनमध्ये येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 04:32 IST

Corona vaccine Update: अमेरिकी औषध कंपनी नोवावॅक्सच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट कोवोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. ही लस यंदाच्या जून महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : अमेरिकी औषध कंपनी नोवावॅक्सच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट कोवोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. ही लस यंदाच्या जून महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.ही माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली. ते म्हणाले की, कोवोवॅक्स ही लस ८९.३ टक्के परिणामकारक असल्याचे ब्रिटनमधील पाहणीत आढळून आले आहे. कोवोवॅक्स लसीच्या भारतामध्ये मानवी चाचण्या करण्यास परवानगी मिळावी याकरिता सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारकडे काही महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे.भारताने जानेवारी महिन्यात जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये सध्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली कोविशिल्ड तसेच भारत बायोटेक या कंपनीची कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात येतात. या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतर लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. कोवोवॅक्स ही लस जून महिन्यापासून उपलब्ध झाल्यास भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लसींमध्ये आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.देशात उपचाराधिनांचे प्रमाण अवघे १.५८ टक्के, बरे झाले १ कोटी ४ लाखदेशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. सध्या १ लाख ६९ हजार रुग्ण असून, त्यांचे प्रमाण अवघे १.५८ टक्के आहे. कोरोनाच्या संसर्गातून १ कोटी ४ लाख लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७ टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात १,०७,३३,१३१ रुग्ण असून, त्यातील १,०४,०९,१६० जण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनामुळे १३७ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींचा आकडा १,५४,१४७ वर पोहोचला आहे. या दिवशी कोरोनाचे १३,०८३ नवे रुग्ण आढळून आले, तर १४,८०८ जण बरे झाले. देशात १,६९,८२४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा मृत्युदर अवघा १.४४ टक्के आहे. जगभरात १० कोटी २६ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ७ कोटी ४३ लाख रुग्ण बरे झाले तर २२ लाख १६ हजार जणांचा बळी गेला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारत