शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Coronavirus: कोरोना लस वर्षाच्या प्रारंभी शक्य;  लसीचे वितरण कसे करायचे यावर अभ्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 00:35 IST

थंडी वाढल्यावर बाहेरच्या देशात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढेल अशी चिंता नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवरील (कोविड-१९) लस भारताकडे पुढील वर्षीच्या प्रारंभी असण्याची शक्यता असून ती अनेक मार्गांनी येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी मंत्रीगटाच्या बैठकीत म्हटले.

‘‘पुढील वर्षीच्या प्रारंभी आमच्याकडे एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून लस आलेली असेल अशी अपेक्षा आहे. देशात या लशीचे वितरण कसे करायचे याची योजना आमचे तज्ज्ञांचे गट तयार करत आहेत,’’ असेही ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनीही म्हटले की, ‘‘२०२० च्या अखेरीस किंवा नूतन वर्षाच्या प्रारंभी लस नोंदणीसाठी तयार असेल.’’‘जॉन्सन अँड जॉन्सन’ने अभ्यास थांबवलाकोविड-१९ लशीचा उलट परिणाम रुग्णावर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने सोमवारी या लशीच्या पुढील पायरीचा अभ्यास थांबवला आहे. या रुग्णाचा ‘ न सांगता येणारा आजार’ सध्या कंपनी तपासत असून त्यानंतर कंपनीने सोमवारी निवेदन प्रसिद्धीस दिले.‘‘कोणत्याही क्लिनिकल (प्रयोग शाळेतील पद्धतीवर आधारित) अभ्यासात विशेषत: व्यापक अभ्यासात अपघात आणि इतर तथाकथित उलट घटना अपेक्षित असतात’ असे कंपनीने त्यात म्हटले. त्या रुग्णाला आलेल्या आजारपणामागील नेमके कारण कोणते हे डॉक्टर्स आणि सुरक्षेवर लक्ष ठेवणारी समिती निश्चित करेल, असेही कंपनीने म्हटले.कोवाक्सिन, कॅडिलाची चाचणी नोव्हेंबरपर्यंतकोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, स्वदेश निर्मित कोवाक्सिन आणि जाइडस कॅडिला वॅक्सिनची चाचणी सुरु आहे. याचे परिणाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात समोर येतील. दोन्ही लसींचा पहिला टप्पा यशस्वी ठरला आहे आॅक्सफर्डच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. याचे परिणाम नोव्हेंबर अखेर वा डिसेंबर मध्यापर्यंत समोर येतील.आॅक्सफोर्ड लसीची चाचणी सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येत आहे. ही चाचणीही योग्य दिशेने सुरु आहे. आतापर्यंत त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.

थंडीसोबत येऊ शकते नवी लाटथंडी वाढल्यावर बाहेरच्या देशात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढेल अशी चिंता नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे. युरोपातील काही देश आणि अमेरिकेत कोरोनाची नवी लाट पहायला मिळत आहे. देशात आता नवरात्र, ईद, दिवाळी, नाताळ आणि नवे वर्ष असे अनेक सण उत्सव आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, विशिष्ट अंतर राखणे आणि हात साबणाने वारंवार स्वच्छ करणे हे उपाय करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या