शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 19:46 IST

आता केंद्र सरकारने परदेशातील कंपन्यांकडून लशीची आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला आहे. सध्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमधील एस्ट्राजेनेची लस तयार करत आहे. तर भारत बायोटेक देशी लस कोव्हॅक्सीन तयार करत आहे. (Corona vaccine)

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आयात करण्याऐवजी मोदी सरकार देशी लस निर्मात्यांकडून लस खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देईल. मोदी सरकारने फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांना, आपली लस विकण्यासाठी परवानगी घेण्यास सांगितले होते.मे महिन्यात देशात रोज साडेचार लाख कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता

नवी दिल्ली - कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. यातच, केंद्र सरकारने परदेशातून कोरोना लस आयात न करण्याचा आणि यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारांवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाची पुष्टी केली आहे. (Corona vaccine: government will not import corona vaccine from foreign countries)

अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आयात करण्याऐवजी मोदी सरकार देशी लस निर्मात्यांकडून लस खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देईल. सरकारने याच महिन्यात खासगी लस निर्मात्यांना अॅडव्हॉन्सड पैसेही दिले आहेत. 

या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर, मोदी सरकारने फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांना, आपली लस विकण्यासाठी परवानगी घेण्यास सांगितले होते. एवढेच नाही, तर यासंदर्भात नियमही शिथील केले होते.

CoronaVirus: धोकेबाज ड्रॅगन! चीननं आधी पुढे केला मदतीचा हात, आता भारताचा मेडिकल सप्लाय रोखला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता केंद्र सरकारने परदेशातील कंपन्यांकडून लशीची आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला आहे. सध्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमधील एस्ट्राजेनेची लस तयार करत आहे. तर भारत बायोटेक देशी लस कोव्हॅक्सीन तयार करत आहे.

मे महिन्यात देशात रोज साडेचार लाख कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता -भारतीय औद्योगिक संस्थेच्या (IIT) वैज्ञानिकांनी गणितीय मॉडेलच्या आधारे, भारतात कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या १४ ते १८ मे दरम्यान ३८-४८ लाखांपर्यंत पोहचू शकते. तसेच ४ ते ८ मे दरम्यान कोरोना संक्रमणाचे रुग्ण दिवसाला साडेचार लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. भारतात सोमवारी कोरोना संक्रमित ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ८१२ लोकांचा जीव गेला आहे. सध्या देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ पर्यंत पोहचली आहे. 

Corona Vaccine: कुणी घेऊ नये कोरोना लस Covishield आणि Covaxin? एका क्लिकवर जाणून घ्या, या लशींसंदर्भात सर्व काही

आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी सूत्र नावाच्या मॉडेलचा वापर करत मे महिन्याच्या पंधरवड्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत १० लाखांनी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. नव्या अंदाजानुसार या आकडेवारीत सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात ११ ते १५ मे दरम्यान कोरोना कहर वाढू शकतो असे सांगितले जात होते. मेच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्ण संख्येत घट होईल, असेही सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार