शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : बापरे! 'कोरोना लस घेतल्यानंतर चेहरा झाला वाकडा'; तरुणीच्या दाव्याने परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 19:16 IST

Girl suffered face paralysis on third day after vaccine : तरुणीने कोरोना लसीकरणानंतर आपला चेहरा वाकडा झाला असं म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,37,16,451 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,870 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 378  जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,47,751 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. याच दरम्यान लसीच्या साईड इफेक्टच्या काही घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर चेहरा वाकडा झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील तरुणीने कोरोना लसीकरणानंतर आपला चेहरा वाकडा झाला असं म्हटलं आहे. 

तरुणीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन याबाबत तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तिने कोविशिल्ड लस घेतली होती. यानंतर दोन दिवस तिला वेदना होत होत्या आणि तिसऱ्या दिवशी तिचा चेहरा वाकडाच झाला. तसेच दोन दिवस तिच्या खांद्यामध्ये आणि मानेत तीव्र वेदना होत होत्या.  तिसऱ्या दिवशी सोमवारी 27 सप्टेंबरला ती सकाळी उठली तेव्हा तिला आपला चेहरा वाकडा झाल्याचं दिसलं. तिने तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. 

कोरोना लसीमुळे फेस पॅरालिसिस झाल्याचा तरुणीचा दावा

डॉक्टारांनी तरुणीला फेस पॅरालिसिस म्हणजे तिच्या चेहऱ्याला लकवा मारल्याचं सांगितलं. तिला काही औषधंही देण्यात आली. पण बरं होण्यास खूप वेळ लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आपल्याला कोरोना लसीमुळे फेस पॅरालिसिस झाला असा दावा या तरुणीने केला आहे. ती तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. तिने प्रशासनाकडून उपचारासाठी मदत मागितली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनावर मात केल्यानंतर देखील तो रुग्णांचा पाठ सोडत नाही आहे. लोकांना विविध समस्या भेडसावत आहेत. काही लोकांची शुगर वाढत आहेत. तर काहींना थकवा जाणवतोय. तर काहींना श्वास घेताना अडचण येत असून वास घेण्याची क्षमता देखील कमी झाली आहे. अशा तक्रारी या कोरोनाग्रस्तांमध्ये पाहायला मिळत आहेत.

कोरोना रुग्णांचं कमी होतंय वजन, कुपोषणाचाही सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

कोरोना रुग्णांचं आता वजन कमी होत असून कुपोषणाचाही सर्वाधिक धोका असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये कुपोषणाची समस्या पाहायला मिळत आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनने हा रिसर्च केला आहे. रिसर्चनुसार, जवळपास 30 टक्के कोरोना रुग्णांचं वजन हे पाच टक्क्यांपर्यंत कमी झालं होतं. तर अर्ध्याहून अधिक रुग्णांना कुपोषणाचा सर्वाधिक धोका आहे. ज्या रुग्णांना याआधी गंभीर स्वरुपात म्युकोरमायसिस म्हणजे ब्लॅक फंगसची लागण झाली होती त्यांच्यामध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आढळून आलं आहे. अनेक कोरोना रुग्णांना थकवा जाणवतं आहे. तसेच अशक्तपणा देखील आला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMadhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टर