शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना लसीमुळे वृद्धांमध्ये निर्माण झाली युवकांइतकीच रोगप्रतिकारशक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 02:06 IST

मॉडेर्ना कंपनीचा दावा; रुग्णांमध्ये गंभीर दुष्परिणामांची नोंद नाही

नवी दिल्ली : अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील मॉडेर्ना ही कंपनीदेखील कोरोना प्रतिबंधक लस विकसित करीत असून, ही लस टोचलेल्या वृद्ध रुग्णांमध्ये तरुण रुग्णांइतकीच रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली, असा दावा या कंपनीने केला आहे.

ही लस ५६ वर्षे तसेच त्याहून अधिक वयाच्या २० जणांना टोचण्यात आली. त्यावेळी त्यांच्यात निर्माण झालेल्या रोगप्रतिकारशक्तीचे प्रमाण युवकांइतकेच होते, असे आढळून आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर वयोवृद्ध लोकांना सर्वात जास्त धोका निर्माण होतो. या संसर्गामुळे बळी पडलेल्यांमध्ये वृद्धांचे प्रमाण लक्षणीय आहे. एकाहून अधिक आजार असलेल्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब असे विकार असलेल्या वृद्धांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन विविध देशातील सरकारे वारंवार करीत आहेत.

या कंपनीने म्हटले आहे की, आम्ही विकसित करीत असलेली कोरोना प्रतिबंधक लस ज्यांना टोचली त्यांच्या प्रकृतीवर कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाले नाहीत. काही रुग्णांना लस टोचल्यावर थकवा, डोकेदुखीचा त्रास झाला; पण अशी लक्षणे दिसतील याची तज्ज्ञांना पूर्वकल्पना होती.विविध कंपन्या, देशांमध्ये सुप्त स्पर्धाऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनिसा या कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित करण्यात आलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा भारतात सुरू झाला आहे. ही लस विकसित करण्यात आॅक्सफर्डला यश येईलच, असे काही तज्ज्ञ सांगत असतानाच मॉडेर्ना कंपनीने आपल्या प्राथमिक निष्कर्षांतून कोरोनाच्या वृद्ध रुग्णांनाही दिलासा दिला आहे. जगभरात कोरोना लस विकसित करण्यासाठी विविध कंपन्या व देशांत एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे. त्यात आता मॉडेर्नाने आपले पत्ते उघड करून शर्यतीत पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या