शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : कोरोनावरील लस Delta variant वर 8 पट कमी प्रभावी, नव्या स्टडीने चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 20:19 IST

Corona Vaccine : ही स्टडी दिल्लीतील सर गंगारामसह देशातील अनेक रूग्णालयातील 100  हेल्थ केअर वर्कर्सवर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) सध्या जागतिक चिंतेचे कारण बनले आहे. एका नवीन स्टडीनुसार असे दिसून आले आहे की,  डेल्टा व्हेरिएंटविरोधात सध्याच्या कोरोना लसीद्वारे तयार झालेल्या अँटीबॉडी 8 पट कमी प्रभावी (संवेदनशील) आहेत. तसेच वुहान स्ट्रेनच्या तुलनेत हा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे. 

ही स्टडी दिल्लीतील सर गंगारामसह देशातील अनेक रूग्णालयातील 100  हेल्थ केअर वर्कर्सवर करण्यात आली आहे. या स्टडीत केंब्रिज विद्यापीठातील वैज्ञानिकही सहभागी झाले होते. लसींवर करण्यात आलेल्या स्टडीनुसार असे दिसून येते की, कोरोना लशीमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजचा डेल्टा व्हेरिएंटवर 8 पट कमी परिणाम होतो. तसेच यामुळे श्वसन यंत्रणेत अधिक गंभीर संक्रमणही होते. याव्यतिरिक्त, त्याची संसर्गजन्य क्षमता देखील खूप जास्त आहे.

युरोपियन एजन्सीचा इशारागेल्या काही दिवसांपूर्वी युरोपीयन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलने (ECDC) देखील म्हटले आहे की,  या उन्हाळ्यात डेल्टा व्हेरिएंटचा जास्त प्रादुर्भाव होईल. विशेषत: अशा तरुणांमध्ये ज्यांना अद्याप लस मिळाली नाही. नवीन डेल्टा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत युरोपमधील 90 टक्के प्रकरणे या व्हेरिएंटशी संबंधित असतील, असा अंदाज आहे. डेल्टा व्हेरिएंट आपल्या आधीच्या अल्फा व्हेरियंटपेक्षा 40-60 पट जास्त संक्रामक असू शकतो, असाही अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे.

अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटचा संसर्गपब्लिक हेल्थ इंग्लंडने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात एकूण नवीन प्रकरणांपैकी 96 टक्के प्रकरणे डेल्टा व्हेरिएंटची आहेत. जर्मनीमध्येही डेल्टा व्हेरिएंटमुळे नवीन कोरोना प्रकरणांची संख्या दुप्पट झाली आहे. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनीही युरोपला डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग पाहता सावध राहण्याचा इशारा दिला. डेल्टा व्हेरिएंटमुळे रशिया देखील वाढलेल्या कोरोना प्रकरणांशी झुंज देत आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे इस्त्राईल आणि ऑस्ट्रेलियामध्येही प्रकरणे वाढत आहेत.

पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट : SBI Reportस्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाची तिसरी लाट पुढील महिन्यात येऊ शकते. याचबरोबर, या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे. या तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर अधिक दिसून येऊ शकतो. तसेच, यादरम्यान, सर्व लोकांचे प्राधान्य कोरोनावरील लस असले पाहिजे. देशात 12-18 वर्ष वयोगटातील 15-17 कोटी मुले आहेत. विकसित देशांप्रमाणेच या वयोगटातील लसी विकत घेण्यासाठी भारतानेही आगाऊ धोरण आखले पाहिजे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या