शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Corona Vaccine: महिन्याला कोव्हॅक्सिनच्या ११ कोटी डोसचे दिवास्वप्न, केंद्रासह महाराष्ट्र, गुजरातचे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 06:02 IST

Corona Vaccine Update: कोव्हॅक्सिन डोसच्या उत्पादनाचे प्रमाण सध्या दोन कोटी डोस आहे.  सरकारी आर्थिक पाठबळामुळे भारत बायोटेकला  जुलै ते ऑगस्टपर्यंत ५ कोटी डोसने उत्पादन वाढविता येईल.

- हरीश गुप्तानवी दिल्ली :   महाराष्ट्र, गुजरातसह अन्य राज्ये आणि केंद्र सरकारभारत बायोटेक लिमिटेड कंपनीला   कोवॅक्सिन लसीचे उत्पादन महिन्याला ११ कोटी डोसपर्यंत  वाढविण्यासाठी निधी देत आहे. कोव्हॅक्सिन डोसच्या उत्पादनाचे प्रमाण सध्या दोन कोटी डोस आहे.  सरकारी आर्थिक पाठबळामुळे भारत बायोटेकला  जुलै ते ऑगस्टपर्यंत ५ कोटी डोसने उत्पादन वाढविता येईल.केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्यांना सहाय्यक अनुदान देत आहे. यात मुंबईस्थित हाफकिन बायोफार्मास्युटिकल कार्पोरेशन (एचबीसी), एनडीडीबीची इंडियन इम्युनॉलॉजिलकल्स आणि बुलंदशहर येथील भारत इम्युनॉलिजिकल्स ॲण्ड बायोलॉजिकल्स कंपनी लिमिटेडचा (बीआयबीसीओएल) समावेश आहे.हाफकिन बायोफार्मास्युटिकल कार्पोरेशनला (एचबीसी) केंद्र सरकारने  ६५ कोटी रुपयांचे अनुदान दिले असून, महाराष्ट्रही ९५ कोटी रुपये गुंतविणार असल्याने  एचबीसी  प्रतिमहा २ कोटी डोसचे उत्पादन करील. तथापि, ही बंद कपनी कार्यान्वित होण्यास दीर्घकाळ लागेल.इंडियन इम्युनॉलॉजिलकल्सची क्षमता वाढविण्यसाठी एनडीडीबी हातभार लावीत आहे. ही कंपनी बीआयबीसीओएलसोबत दरमहा १ ते १.२० कोटी डोसचे उत्पादन करील. केंद्र सरकारने बीआयबीसीओएलला ३० कोटी रुपये दिले असून, या कंपनीने अद्याप नवीन प्रयोगशाळा स्थापन केलेली नाही. परंतु, या कंपनीची ही  सर्व  उत्पादन प्रक्रिया ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्येच सुरू होईल.  तसेच  भारत बायोटेक कंपनीकडून या कंपनीला तंत्रशास्त्र  देण्याची प्रक्रिया चालू आहे.  ही कंपनी पोलिओ लसीचे उत्पादन करते.भारत बायोटेक लिमिटेड स्वत:चे सयंत्र स्थापन करणार असून, नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत ती कार्यान्वित होतील. यात २ दशलक्ष डोसचे उत्पादन होईल आणि उत्पादन क्षमता ५ ते ६ दशलक्ष डोसने  वाढविले जाईल, असे सुत्रांनी सांगितले. गुजरातेत दरवर्षी २० कोटी डोस : गुजरातस्थित हेस्टर बायोसायन्सेन कंपनीने गुंतवणुकीसह  कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी  गुजरात सरकारशी समझोता केला आहे. भारत बायोटेक कंपनी गुजरातमधील अंकलेश्वर येथील  शिरॉन बेहरिंग या कंपनीत वर्षाकाठी २० डोसचे उत्पादन करणार आहे. सीरम प्रतिमहा कोविशिल्डचा ७ कोटी डोसचा पुरवठा करीत असून, जुलैपर्यंत ११ कोटीने वाढविणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार