शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination: त्या वॉर्डबॉयचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेममधून समोर आली माहिती

By बाळकृष्ण परब | Updated: January 18, 2021 13:16 IST

मुरादाबाद ( उत्तर प्रदेश ) - देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, लसीकरणानंतर उत्तर प्रदेशमधील मुरादाबात ...

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील मुरादाबात जिल्ह्या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयचा रविवारी तब्येत बिघडून झाला होता मृत्यू या वॉर्डबॉयच्या मृत्यूला कोरोनाची लस कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होताया वॉर्डबॉयचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे पोस्टमार्टेम अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) - देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, लसीकरणानंतर उत्तर प्रदेशमधील मुरादाबात जिल्ह्या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयचा रविवारी तब्येत बिघडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला कोरोनाची लस कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मात्र आता पोस्टमार्टेम रिपोर्टमधून या वॉर्डबॉयच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा झाला आहे. या वॉर्डबॉयचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे पोस्टमार्टेम अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.महिपाल सिंह असे या ४६ वर्षीय वॉर्डबॉयचे नाव असून, त्यांना १६ जानेवारी रोजी कोरोनावरील लस देण्यात आली होती. त्यानंतर रविवारी तब्येत बिघडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिपाल सिंह यांचा मृत्यू कोरोनावरील लसीमुळे झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. दरम्यान, हे आरोप फेटाळताना मुख्य आरोग्य अधिकारी एमसी गर्ग यांनी महिपाल यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण हे हृदयविकार असल्याचे म्हटले आहे.

जिल्हाधिकारी राकेश कुमार सिंह यांनीही महिपाल सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले. तसेच महिपाल यांच्या मृत्यूनंतर लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी ताकीद यांनी दिली आहे. महिपाल यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. त्यानंतर ते घरी गेले होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, लस देण्यापूर्वी महिपाल यांची वैद्यकीय चाचणीही केली गेली नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.याबाबत सीएमओने सांगितले की, लसीकरण अभियानामध्ये मुरादाबादमध्ये ४७९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUttar Pradeshउत्तर प्रदेश