शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Corona Vaccination : लसीकरण पूर्ण व्हायला उजाडेल २०२३, जगातील सर्वांत मोठी मोहीम ‘कासवगतीने’; दररोज ५० लाख लोकांना डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 06:05 IST

Corona Vaccination : देशातील असंख्य लसीकरण केंद्रे नियमित सुरू नाहीत. जिथे मोफत लसीकरण होते त्या शासकीय केंद्रात लस आलीच तर ती दुसऱ्या डोससाठी आणि ४५ वर्षे वयांवरील लोकांसाठी आहे. 

- विकास झाडेनवी दिल्ली : जगातील सगळ्यात मोठे लसीकरण, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमानाने सांगितले असले तरी देशात लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू असून, नागरिकांचे संपूर्ण लसीकरण होण्यास २०२३ उजाडणार आहे. मोदी यांनी ८८ मिनिटांच्या भाषणात कोरोना लसीकरणाबाबत भारत किती सरस ठरला हे सांगितले असले तरी अन्य प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे आहे. देशातील असंख्य लसीकरण केंद्रे नियमित सुरू नाहीत. जिथे मोफत लसीकरण होते त्या शासकीय केंद्रात लस आलीच तर ती दुसऱ्या डोससाठी आणि ४५ वर्षे वयांवरील लोकांसाठी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच चित्र आहे. विदेशात लहान मुलांचे लसीकरण झाले. भारतात १२ वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरू होणार होते. त्यालाही आता विलंब होत आहे.दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ पर्यंत देशभरात ५४ कोटी ५८ लाख ५७ हजार १०८ जणांना लस देण्यात आली आहे. यात पहिली डोस घेणारे ४२ कोटी ८० लाख, तर दुसरा डोस घेणारे बारा कोटी १७ लाख आहेत. देशाला पुन्हा २१५ कोटी डोसची गरज आहे. केंद्र सरकारने डिसेंबर २०२१पर्यंत देशातील प्रत्येकाचे लसीकरण होईल असे सांगितले होते. त्यानुसार देशात दररोज दीड कोटी लोकांचे लसीकरण व्हायला पाहिजे. परंतु, प्रत्यक्षात होतात सरासरी ५० लाख. जागतिक आरोग्य संघटनेने आणखीन एका नवीन व्हायरसचा इशारा दिला आहे. वटवाघळामुळे ‘मरबर्ग’ हा नवीन आजार पसरत असून, हादेखील जीवघेणा आजार आहे. 

९५ देशांना पुरवल्या लसी!   देशासमोर कोरोनाचे खूप मोठे आव्हान असताना मोदी सरकारने २१ जानेवारी ते १६ एप्रिल २०२१ या ८५ दिवसांमध्ये जगातील ९५ देशांना ६ कोटी ६३ लाख ७० हजार लसी पुरवल्यात. त्या उपक्रमाला ‘व्हॅक्सिन मैत्री’ असे नाव देण्यात आले होते. त्यात सर्वाधिक बांगला देशला ३३ लाख डोस अनुदानित स्वरूपात दिले आहेत. त्यानंतर म्यानमार १७ लाख, नेपाळ ११ लाख, भूतान ५.५ लाख, मालदीव दोन लाख तसेच मॉरिशसला एक लाख लसींचे डोस अनुदान स्वरूपात दिलेत.     व्यावसायिकतेच्या अनुषंगाने बांगलादेशला ७० लाख डोस पुरविण्यात आले आहेत. म्यानमार २० लाख, नेपाळ १० लाख, मालदीव १ लाख आणि मॉरिशसला ३ लाख डोस पुरवले. याशिवाय श्रीलंका, ब्राझील, ओमान, मिस्त्र, अल्जीरिया, दक्षिण आफ्रिका, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, अफगाणिस्तान, अर्जेंटिना, घाना, नायजेरिया, कंबोडिया, सीरिया आदी देशांना लस पुरविण्यात आली.

१२ ऑगस्ट४४ लाख १९ हजार ६२७ १३ ऑगस्ट५७ लाख ३१ हजार ५७४ १४ ऑगस्ट६३ लाख ८० हजार ९३७ १५ ऑगस्ट७३ लाख ५० हजार ५५३ १६ ऑगस्ट१७ लाख ४३ हजार ११४ 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या