शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरण 50 काेटींवर! रुग्णवाढ हाेत असतानाच दिलासादायक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 08:03 IST

Corona Vaccination in India: देशामध्ये लसीचा डाेस घेणाऱ्यांची संख्या ५० काेटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ हाेत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समाेर आले आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये लसीचा डाेस घेणाऱ्यांची संख्या ५० काेटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ हाेत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समाेर आले आहे. यामध्ये पहिला डाेस घेणारे ३९ काेटी तर दुसरा डाेस पूर्ण करणारे ११ काेटी जण आहेत. लसीचा एकही डाेस न घेणाऱ्यांमध्ये नवीन काेराेना रुग्ण माेठ्या संख्येने आढळत आहेत. गेल्या चोवीस तासांत ४४६४३ नवे कोरोना रुग्ण आढळले तर ४१,०९६ रुग्ण यातून बरे झाले. नव्या रुग्णांचे हे प्रमाण गेल्या महिनाभरातील सर्वाधिक आहे. केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. उपचार घेणाऱ्यांचा आकडा ४ लाख १४ हजारांवर गेला असून आणखी ४६४ जण या संसर्गाने मरण पावले. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवा अशी सूचना केंद्र सरकारकडून राज्यांना वारंवार दिली जात आहे.  कोरोना संसर्गाने आतापर्यंत ४ लाख २६ हजार ७५४ जण मरण पावले. उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण १.३० टक्के आहे.  - दररोजचा व आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे २.७२ टक्के व २.४१ टक्के आहे. दररोजचा संसर्गदर सलग ११ व्या दिवशी ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.  - संसर्गातून ९७.३६ टक्के रुग्ण बरे झाले. आजवर पार पडलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ४७ कोटी ६५ लाख ३३ हजार ६५० झाली आहे. तर मृत्यूदर १.३४ टक्के आहे.  

जगात दीड कोटी लोकांवर उपचार सुरूn जगामध्ये २० कोटी १७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १८ कोटी १४ लाख जण बरे झाले. n १ कोटी ५९ लाख लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, ४२ लाख ८० हजार लोकांचा मृत्यू झाला. n अमेरिकेमध्ये ३ कोटी ६३ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ३ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले व ५८ लाख ६४ हजार लोकांवर उपचार सुरू आहेत. n कोरोनामुळे अमेरिका व ब्राझिलमध्ये अनुक्रमे ६ लाख ३१ हजार व ५ लाख ६० हजार जणांचा मृत्यू झाला. 

‘जॉन्सन’चा लसीच्या मंजुरीसाठी अर्जअमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने आपल्या एका डोसच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. याआधीही  सदर कंपनीने असा अर्ज केला होता. मात्र आता मान्यताप्राप्त लसींसाठी चाचण्यांची अट केंद्राने दूर केली असल्याने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला थेट मंजुरीसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत