शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: अमेरिकेने निर्बंध हटविले; लस उत्पादन होणार सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:08 IST

तरणजितसिंग संधू यांची माहिती; पुरवठा साखळी सुरळीत होणार

वॉशिंगटन : अमेरिकेने ‘संरक्षण उत्पादन कायदा’ (डीपीए) हटविला असून त्यामुळे पुरवठा साखळीतील अडथळे दूर होऊन कोरोनाविरोधातील लसीचे उत्पादन अधिक सुलभ होईल, अशी माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू यांनी दिली. संधू यांनी सांगितले की, अमेरिकेच्या संरक्षण उत्पादन कायद्याचा अंमल संपल्यामुळे आता पुरवठ्यातील प्राधान्ये दूर झाली आहेत. ॲस्ट्राजेनेका व नोव्हॅक्स यासारख्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी त्यामुळे सुलभ होईल.सूत्रांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या बाबतीत अमेरिकी नागरिकांना प्रथम प्राधान्य मिळावे यासाठी अमेरिकी सरकारने संरक्षण उत्पादन कायदा देशात लागू केला होता. त्यामुळे कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय निर्यात करता येत नव्हती. अमेरिकेबाहेर उत्पादित होणाऱ्या लसींना याचा मोठा फटका बसला होता. भारतातील लस उत्पादकांनाही या कायद्याचा फटका बसला आहे. या कायद्याचा अंमल आता हटला आहे. त्यामुळे कोणत्या देशाला कोणत्या वस्तूंची निर्यात करायची याचा निर्णय कंपन्या स्वत:च्या अखत्यारित घेऊ शकतील.व्हाईट हाऊसचे ‘कोविड-१९ प्रतिसाद’ समन्वयक जेफ जिएंट्स यांनी संरक्षण उत्पादन कायदा हटविण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी केली होती. आपल्या निवेदनात त्यांनी ॲस्ट्राजेनेका, नोव्हॅक्स आणि सनोफी या लसींचा उल्लेखही केला होता.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस