शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : दोन डोस ५०० रुपयांत?, कोरोना लढाईत कोर्बेव्हॅक्स लसीचा लवकरच प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:20 IST

Corona Vaccination : सरकारने कोर्बेव्हॅक्स लसीच्या ३० कोटी मात्रांची ऑर्डर दिली आहे. या कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस केवळ ५०० रुपयांत मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

कोरोनावर विजय मिळविण्यासाठी वेगवान लसीकरण हा एकमेव उपाय असून लस हे या लढाईतील महत्त्वाचे शस्त्र आहे. आता नवी लस येत आहे. सरकारने कोर्बेव्हॅक्स लसीच्या ३० कोटी मात्रांची ऑर्डर दिली आहे. या कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस केवळ ५०० रुपयांत मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

नवीन लस : कोर्बेव्हॅक्स- वर उल्लेखलेल्या लसींमध्ये आणखी एक लसीचा समावेश होणार आहे.- त्या लसीचे नाव कोर्बेव्हॅक्स आहे.-  हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई या कंपनीने ही लस तयार केली आहे.- केंद्र सरकारने कोर्बेव्हॅक्स लसीच्या ३० कोटी मात्रांची ऑर्डर या कंपनीकडे नोंदवली आहे.

या लसीचे महत्त्व काय?- लसीच्या निर्मितीला बायोलॉजिकल ई कंपनीने सुरुवात केली असून केंद्र सरकारने ३० कोटी लसमात्रांची ऑर्डर नोंदवली आहे. त्यामुळे १५ कोटी लोकांचे लसीकरण करता येणार आहे.- लसीच्या प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांना केंद्र सरकारने पाठिंबा दिला. तसेच १५०० कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळही उपलब्ध करून दिले आहे.- लसींचा तुटवडा देशात भासत असताना कोर्बेव्हॅक्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. कोरोनाविरोधातील लढाईत ही लस महत्त्वाची ठरेल, असा सरकारला विश्वास आहे.

कोर्बेव्हॅक्स आहे काय?- कोर्बेव्हॅक्स ही रिकॉम्बिनन्ट प्रोटिन सब-युनिट प्रकारची लस आहे. कोरोनाच्या स्पाइक प्रोटिन या विशिष्ट भागापासून तिची निर्मिती करण्यात आली आहे. - स्पाइक प्रोटिन विषाणूला शरीरात प्रवेश करण्यास मदत करतो जेणेकरून त्याची प्रतिकृती तयार होऊन आजार निर्माण होतो. परंतु फक्त प्रोटिनच शरीरात प्रवेश करू शकले तर त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होत नाही. कारण विषाणू अनुपस्थित असतो.- लसीत असलेला स्पाइक प्रोटिन शरीरात इंजेक्ट केला की त्यामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे जेव्हा संसर्ग होतो तेव्हा स्पाइक प्रोटिन प्रतिरोध करतात. - हेपेटायटिस-बी लस तयार करण्यासाठी ही पद्धत गेल्या कित्येक वर्षांपासून वापरली जाते. मात्र, कोरोनाविरोधातील लढाईत कोर्बेव्हॅक्सच्या निर्मितीत प्रथमच हा प्रयोग केला जाणार आहे.

देशात सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या लसी- कोविशिल्ड (सीरम इन्स्टिट्यूट)- कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक आणि आयसीएमआर)- स्पुतनिक व्ही (रशिया)- येत्या एक-दोन महिन्यांत आणखी काही लसी बाजारात उपलब्ध होणार आहेत.

निर्मिती कुठे केली जात आहे- कोर्बेव्हॅक्सची निर्मिती हैदराबादेतील बायोलॉजिकल ई या हैदराबादस्थित कंपनीकडून केली जात आहे. मात्र, या लसीच्या निर्मितीची मुळे ह्यूस्टनस्थित बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन्स नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेतमध्ये सापडतात- या संस्थेत रिकॉम्बिनन्ट प्रोटिन लसीच्या निर्मितीवर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन्स नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेनेच बायोलॉजिकल ई कंपनीला प्रॉडक्शन सेल बँकेचा पुरवठा केला

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या