शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Corona Vaccination: 'कोरोना लस घेण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता येणार नाही'- सुप्रीम कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2022 12:11 PM

Corona Vaccination: 'जनहितासाठी सरकार लोकांना जागरूक करू शकते, जबरदस्ती नाही.'

Corona Vaccine: देशातील कोरोना लसीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही, अशी महत्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. कोविड लसीकरणाची अनिवार्य आवश्यकता घटनाबाह्य ठरवणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, धोरण ठरवण्यावर काहीही बोलणे योग्य नाही, पण कोणालाही लसीकरण करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. जनहितासाठी सरकार लोकांना जागरूक करू शकते. अनिवार्य कोविड लसीकरण घटनाबाह्य असल्याचे घोषित करणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टी सांगितल्या. 

राज्य सरकारांनी निर्बंध हटवावेत: न्यायालयसार्वजनिक हितासाठी सरकार लोकांना जागरूक करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही. महामारीच्या काळात लसीकरणाच्या आवश्यकतेबाबत काही सरकारांनी घातलेले निर्बंध ताबडतोब काढून टाकले पाहिजेत, असे कोर्टाने म्हटले.

लसीकरण हा वैयक्तिक निर्णय: न्यायालयआपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. कोविड लसीकरणाबाबत केंद्र सरकारचे धोरण योग्य असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लसीकरण करायचे की नाही हा प्रत्येक नागरिकाचा वैयक्तिक निर्णय आहे. कोणावरही लस घेण्याची सक्ती करता येणार नाही.

निर्बंध लादले जाऊ नयेत: न्यायालयसर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही. आता संसर्गाचा प्रसार आणि तीव्रतेमुळे संक्रमित लोकांची संख्या कमी झाली आहे, सार्वजनिक ठिकाणी हालचालींवर कोणतेही निर्बंध लादले जाऊ नयेत. सरकारने यापूर्वीच असा काही नियम किंवा निर्बंध लादले असतील तर ते मागे घ्यावेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार