शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: 'देशात एवढ्या लवकर लसीकरण होणे, पंतप्रधानांची दूरदृष्टी'; अदर पूनावालांकडून नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 18:30 IST

अदर पूनावाला एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, 'नंबर येऊनही ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही, असे लोक आळशी आहेत.' महत्वाची गोष्ट म्हणजे देशभरात तब्बल 10 कोटी लोकांनी अद्याप नंबर येऊनही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. 

नवी दिल्ली - देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा 100 कोटींवर पहोचला आहे. याबद्दल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla)  यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दूरदृष्टीला जाते, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. याच वेळी, ज्यांनी आपला नंबर येऊनही दुसरा डोस घेतला नाही, अशा लोकांवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

अदर पूनावाला एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, 'नंबर येऊनही ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही, असे लोक आळशी आहेत.' महत्वाची गोष्ट म्हणजे देशभरात तब्बल 10 कोटी लोकांनी अद्याप नंबर येऊनही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. 

भारतात 16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाली. या अंतर्गत 18 वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. देशात 18 वर्षांवरील लोकसंख्या सुमारे 94 कोटी एवढी आहे. या लोकसंख्येच्या 75% लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर या लोकसंख्येच्या 30% लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

सरकारने डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व वयस्क नागरिकांना म्हणजेच 94 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, लोकांना दुसरा डोसही लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 95% जनतेला मोफत लस -देशातील सुमारे 95% जनतेला मोफत लस देण्यात आली आहे. 7 बिलियन लोकसंख्या असलेल्या जगात 1 बिलियन डोस एकट्या भारतात दिले गेले आहेत. गेल्या जुलै महिन्यात देशात लसीकरणाचा वेग वाढला आहे. मुलांचे लसीकरण अद्याप विचाराधीन आहे. निरोगी मुलांमध्ये लसीकरण पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरू होऊ शकते. 

हेही वाचा -

100 कोटी डोस! सीरमशिवाय अशक्यप्राय होते, पुनावालांनी 5 लाखांत सुरु केली होती कंपनी

भारतात फक्त 50 दिवसांतच टोचले गेले कोरोना लसीचे 44 कोटी डोस; जाणून घ्या, 10 मोठे टप्पे

 

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या