शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Corona Vaccination: कोरोना लसीकरणामध्ये भारताची मुसंडी, अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत ३४ कोटी लोकांचे लसीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:00 IST

Corona Vaccination in India: अनेक अडथळ्यांचा संकटांचा सामना करत भारतामध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे.

नवी दिल्ली - अनेक अडथळ्यांचा संकटांचा सामना करत भारतामध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. दरम्यान, या मोहिमेमध्ये आतापर्यंत देशातील ३४ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Corona Vaccination in India) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १८ ते ४४ वयोगटामधील सुमारे ९ कोटी ४१ लाख ३ हजार ९८५ जणांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर या वयोगटातील २२ लाख ७३ हजार ४७७ लोकांनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार ३४ कोटी ७६ हजार २३२ लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. तर सुमारे ४२ लाख लोकांना गेल्या २४ तासांत लस देण्यात आली आहे. (India's lead in corona vaccination surpasses US, vaccinating 340 million people so far)

आरोग्य मंत्रालाने सांगितले की, लसीकरण मोहिमेच्या १६७ व्या दिवशी १ जुलै रोजी ४२ लाख ६४ हजार १२३ लोकांना कोरोनावरील लस दिली गेली. ज्यामधील ३२ लाख ८० हजार ९९८ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर ९ लाख ८३ हजार लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. तर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील २४ लाख ५१ हजार ५३९ लोकांनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला. तर ८९ हजार २७ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. दरम्यान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील ५० लाखांहून अधिक लोकांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

ग्लोबल व्हॅक्सिन ट्रॅकरच्या ताजा आकडेवारीनुसार भारतामध्ये आतापर्यंत ३४ कोटी लोकांना कोरोनावरील लसीचा डोस मिळाला आहे. तर अमेरिकेमध्ये ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ लोकांचे लसीकरण झाले आहे. याआधारावर लसीकरणाच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. कोरोना लसीकरणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर यूके आहे. येथे आतापर्यंत ७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९० जणांचे लसीकरण झाले आहे. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीमध्ये ७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४ जणांचे लसीकरण झाले आहे.

दरम्यान, भारतामध्ये कोरोनाला मात देण्यासाठी डिसेंबर २०२१ पर्यंत देशातील १०० कोटींहून अधिक लोकांना कोरोनावरील लस देण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. मात्र सध्याची लसीकरणाची गती आणि लसींची उपलब्धता यांचा विचार केला असता हे लक्ष्य साध्य होणे कठीण दिसत आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय