शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Coronavirus : उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचंही होणार लसीकरण; पाहा सेंटर्सवर कसं करता येईल रजिस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 08:37 IST

१ एप्रिलपासून ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मिळणार कोरोनाची लस, प्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी महाराष्ट्राकडून विनंतीच केली नसल्याची आरोग्य सचिवांची माहिती

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मिळणार कोरोनाची लसप्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी महाराष्ट्राकडून विनंतीच केली नसल्याची आरोग्य सचिवांची माहिती

Covid-19 Vaccination India: काही दिवसांपूर्वी ६० वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. यानंतर १ एप्रिल पासून सरकारनं ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याची माहिती दिली. लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना https://cowin.gov.in या संकेतस्थळावरून किंवा आरोग्य सेतू अॅपवरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. परंतु ज्या लोकांना अपॉईंटमेंट आधी घ्यायची नसेल त्यांना आपल्या नजीकच्या कोरोना लसीकरण केंद्रावर दुपारी ३ वाजता जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली. ऑनसाईट रजिस्ट्रेशनसाठी लोकांना आपल्या सोबत आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र नेता येईल. तसंच पासबूक, पासपोर्ट, रेशन कार्डदेखील ओळखपत्र म्हणून दाखवू शकता, असं केंद्रीय आरोग्य सचिव आर. भूषण म्हणाले.आतापर्यंत देशात ८०७ युके व्हेरिअंट्स, ४७ साऊथ आफ्रिकन व्हेरिअंट्स आणि १ ब्राझिलियन व्हेरिअंट दिसून आले असल्याचं आर. भूषण म्हणाले. पॉझिटिव्ह रेटच्या साप्ताहिक राष्ट्रीय सरासरीबाबत सांगायचं झालं तर तो ५.६५ टक्के आहे. महाराष्ट्रात तो २३ टक्के आणि पंजाबमध्ये ८.८२ टक्के इतका आहे. याशिवाय छत्तीसगढमध्ये ८ टक्के, मध्यप्रदेशात ७.८२ टक्के. तामिळनाडूत २.५० टक्के. कर्नाटकात २.५४ टक्के, गुजरातमध्ये २.२ टक्के आणि दिल्लीतर २.०४ टक्के इतका आहे. या राज्याना कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यास सांगितलं असल्याची माहितीदेखील भूषण यांनी दिली. "होम क्वारंटाईन बद्दल पाहताना त्याचं पालन केलं जातंय का नाही हे पाहणं आवश्यक आहे. जर असं होत नसेल तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं गेलं पाहिजे," असंही ते म्हणाले. प्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी विनंतीच नाहीमहाराष्ट्र सरकारनं प्रत्येक घरात जाऊन लसीकरण करण्यासाठी कोणता प्रस्ताव ठेवलाय का असा सवाल आर. भूषण यांना करण्यात आला. भारतामध्ये युनिव्हर्सल इम्युनिझेषन आहे. परंतु यानंतरही डोअर टू डोअर लसीकरण होत नाही. महाराष्ट्रानं यासाठी कोणतीही विशेष विनंती केली नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रAdhar Cardआधार कार्डpassportपासपोर्ट