शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

100 crore Corona Vaccination: 100 कोटींचा लस उत्सव; कोरोनाविरोधातील लढाईत देशाने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 07:21 IST

100 crore Corona Vaccination: सर्वत्र उत्साहाचे वातावरण; मात्र खबरदारी घेणे आवश्यकच

नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसींचे १०० कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा गुरुवारी देशाने ओलांडला. अवघ्या दहा महिन्यांत भारताने ही नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक डोस देण्यात आले असून, त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.देशासाठी अत्यंत अभिमानास्पद असलेल्या या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी डाॅ. राममनोहर लोहिया रुग्णालयात गेले. तेथील लसीकरण केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि लसीकरणाबाबत चर्चा केली.  पंतप्रधानांनी या निमित्ताने देशभरातील सर्व  डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हेदेखील होते. आरोग्य कर्मचाऱ्यांचे आपण सारे कृतज्ञ १०० कोटी डोसचा टप्पा पार करून भारताने इतिहास रचला आहे. हा ऐतिहासिक टप्पा पार करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांच्याप्रति देशवासीय कृतज्ञ आहेत.      - नरेंद्र मोदी, पंतप्रधानअरुण राय १०० कोटींचे लसवंत!लसीचा १०० कोटीवा डोस डाॅ. लोहिया रुग्णालयात अरुण राय या दिव्यांग व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देण्यात आला. राय वाराणसीचे आहेत. ते म्हणाले की, या प्रसंगी मला मोदी यांच्याबरोबर सेल्फी काढण्याची इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही. अपंगांना दिव्यांग असे संबोधून तुम्ही त्यांना आदराने वागवत आहात असे मी मोदी यांना सांगितले.मोहिमेचे टप्पे१६ जानेवारी रोजी प्रारंभ. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना प्राधान्याने लस. २ फेब्रुवारीपासून कोरोना योद्धयांना लस देण्यास सुरूवात १ मार्चपासून ६० वर्षे वयावरील लोक तसेच एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या व ४५ वर्षे वयापुढील लोकांचे लसीकरण १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय१ मे पासून १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व लोकांचे लसीकरण सुरूभारताचे कौतुकभारतीय नागरिकांना १०० कोटी डोस देण्याचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस घेब्रेस्युस यांनीही भारताचे अभिनंदन केले. या संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या संचालक डाॅ. पूनम खेत्रपाल सिंग यांनीही भारताचे तसेच देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या