शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: राज्यांना कोरोना लस मिळणार, पण १८-४५ वयोगटासाठी वापरता येणार नाही; केंद्राची तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 12:08 IST

Corona Vaccination for 18-45 age group in india: महाराष्ट्र सरकारने सीरम आणि भारत बायोटेककडे पत्र पाठवून १२ कोटी लसी लागणार असल्याची मागणी नोंदविली आहे. मात्र, सीरमने राज्य सरकारला २० मे पर्यंत आपण एकही लस महाराष्ट्राला देऊ शकणार नसल्याचे म्हटले आहे. ही परिस्थिती अन्य राज्यांची देखील आहे.

देशभरात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण  (corona vaccination) करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत ४५ वर्षांवरील नागरिकांनाच पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याची बोंब असताना केंद्राने जाहीर केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. अशातच केंद्र सरकारने आपण देत असलेली लस १८ ते ४५ वयोगटासाठी वापरता येणार नसल्याचे राज्यांना कळविले आहे. (vaccine given by the Centre cannot be used for the population below 45 years of age)महाराष्ट्र सरकारने सीरम आणि भारत बायोटेककडे पत्र पाठवून १२ कोटी लसी लागणार असल्याची मागणी नोंदविली आहे. मात्र, सीरमने राज्य सरकारला २० मे पर्यंत आपण एकही लस महाराष्ट्राला देऊ शकणार नसल्याचे म्हटले आहे. या लसी केंद्र सरकारने आरक्षित केल्या असल्याने महाराष्ट्राला लस पुरवू शकत नाही, अशा शब्दांत सीरमने असमर्थता दर्शविली आहे. तप भारत बायोटेकने पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्राला केवळ ८६ लाख लसी पुरवू शकतो असे सांगितले आहे. ही परिस्थिती अन्य राज्यांची देखील आहे. यामुळे जरी १८ वरील वयोगटाला लसीकरण सुरु झाले तरी देखील लस उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. 

Registration for Vaccine: कोरोना लसीसाठी रजिस्टर करताय? 18+ साठी सायंकाळी 'या' वेळेपासून सुरु होणार

यामुळे राज्यांनी केंद्राकडून लस आल्यास ती या वयोगटातील लोकांना देण्याची तयारी सुरु केली होती. मात्र, केंद्र सरकारने आपण देत असलेली लस तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना देण्यास मनाई केली आहे. 

अतिरिक्त सचिव मनोहर आघानी यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात ही सूचना करण्यात आली आहे. कंपन्या जी लस बनवतील त्याचा ५० टक्के वाटा हा केंद्र सरकारचा आहे. ही लस राज्यांनाच दिली जाणार आहे. परंतू राज्यांनी ही लस ४५ वर्षांवरील आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच दिली पाहिजे. ही लस १८ ते ४५ वर्षांखालील लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात वापरता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत कोणतेही शुल्क न आकारता राज्यांना १५ कोटी लसी पुरविल्या आहेत.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या