शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

Corona Vaccination: एकदा घेतली की अनेक वर्षे संरक्षण; गेमचेंजर लस लवकरच भारतात येणार; आजच मोठा निर्णय अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 13:35 IST

Corona Vaccination: डीसीजीआय आजच महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घसरण सुरू आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून देशात लवकरच चौथी लस उपलब्ध होणार आहे. याबद्दलचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. 

भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) मॉडर्ना लसीला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलचा निर्णय आजच होऊ शकतो अशी माहिती एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. मॉडर्ना लसीची आयात करण्याची परवानगी सिप्ला कंपनीला लवकरच दिली जाऊ शकते, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे. याआधी अशाच प्रकारची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबला देण्यात आली होती. त्यानंतर रशियात तयार झालेली स्पुटनिक व्ही लस भारतात आली. भारतात आलेली ती पहिली परदेशी लस ठरली. आता यानंतर मॉडर्ना दुसरी लस ठरू शकते. कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट समोर येत असताना आणि त्यामुळे चिंतेत भर पडत असताना मॉडर्ना लसीबद्दल सकारात्मक माहिती पुढे आली आहे. mRNA तंत्रावर आधारित मॉडर्ना लस कोरोना विषाणूविरोधात आयुष्यभर संरक्षण देऊ शकते. ही लस घेतल्यानंतर कोरोना विषाणूविरोधात अतिशय मजबूत रोगप्रतिकाशक्ती तयार होते अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या दोन व्हेरिएंटविरोधात मॉडर्ना लसीची चाचणी घेण्यात आली. त्या दोन्ही व्हेरिएंटविरुद्ध मॉडर्ना लस प्रभावी ठरली. कोरोना लस टोचण्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरात मुबलक प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या. त्यामुळे मॉडर्ना लस घेणाऱ्या व्यक्तींना कोरोनापासून अनेक वर्षे किंवा आजीवन संरक्षण मिळू शकतं. याशिवाय ही लस घेणाऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचीदेखील गरज भासणार नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या