शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 22:14 IST

PM Modi on Omicron : सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी, आता आपण 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारी 2022 पासून लसी करणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली.

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. आपण वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारच कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत. आपले वैज्ञानिक कोरोनावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी, आता आपण 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारी 2022 पासून लसीकरणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली. ते कोरोना पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करत होते. (PM Modi on Omicron and Corona Vaccination for children)करोना संपलेला नाही, सतर्कता आवश्यक -मोदी म्हणाले, अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळाल्याने कोरोनाविरोधातील लढाई आणखी मजबुत होईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांची चिंताही दूर होईल. या शिवाय कोरोना वॉरियर्सनाही लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे.

हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना मिळणार प्रिकॉशन -15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांबरोबरच कोरोना विरोधातील लढाईत महत्वाचे योगदान देणाऱ्या हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाही कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्रिकॉशन म्हणून 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात होईल, याच बरोबर 60 वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.

अफवांपासून दूर राहा - याच वेळी पंतप्रधान मोदींनी, अफवा आणि भीती निर्माण करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यांवर विश्वास ठेऊ नका त्यांपासून दूर राहा. आपण सर्वांनी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबविली आहे. आपल्या सर्वांचे प्रयत्नच देश करोनाविरोधात मजबूत करतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस