शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: नाकावाटे लस... कितपत परिणामकारक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 06:33 IST

Corona Vaccination India: औषध महानियंत्रकांनी अलीकडेच कोव्हॅक्सिन लसीचे निर्माते असलेल्या भारत बायोटेक कंपनीला नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीच्या बूस्टर डोसची चाचणी करण्यासाठी संमती दिली. दोन टप्प्यांतील या चाचण्या शेकडो स्वयंसेवकांवर केल्या जाणार आहेत.

औषध महानियंत्रकांनी अलीकडेच कोव्हॅक्सिन लसीचे निर्माते असलेल्या भारत बायोटेक कंपनीला नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीच्या बूस्टर डोसची चाचणी करण्यासाठी संमती दिली. दोन टप्प्यांतील या चाचण्या शेकडो स्वयंसेवकांवर केल्या जाणार आहेत. त्यावरून बूस्टर डोसची परिणामकारकता अभ्यासता येणार आहे. 

नाकावाटे दिली जाणारी लस म्हणजे काय?बरेचदा लसी या इंजेक्शन त्वचेवर टोचून शरीरात सोडल्या जातात. लहान मुलांना तोंडावाटे लसी दिल्या जातात. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसी दुर्मीळ असून त्या नाकात फवारल्या जातात. कोरोनासह अनेक विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे विषाणूंचा प्रवेशद्वारावरच नायनाट करण्यासाठी लसीचा हा प्रकार विकसित केला गेला आहे. 

लसीचे महत्त्व काय?- नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसींमुळे व्यापक प्रमाणात करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेतील अडचणी दूर होतात.- सुई आणि सीरिंजचा वापर नसल्याने लसीकरणाचा खर्च कमी होतो.-  इंजेक्शनद्वारे लस देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यांच्या प्रशिक्षणावर खर्च होतो.- नाकावाटे लस देणे तुलनेने सोपे असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळे प्रशिक्षण देण्याची गरज भासत नाही.- या कारणांमुळे नाकावाटी दिली जाणारी लस महत्त्वाची ठरते. 

लस कसे काम करते?- नाकावाटे दिली जाणारी  लस रक्तात प्रतिसादाची निर्मिती करतात.- रक्तातील पेशी लसीतील अँटिबॉडीजचे मंथन करतात. लसीमुळे तयार झालेल्या या अँटिबॉडीज विषाणूला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात.- नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचे डोस नाकातील श्लेष्मावरणात टिकाव धरतात. त्या ठिकाणच्या रक्तपेशी आयजीए नामक अँटिबॉडीचा दुसरा प्रकार तयार करतात.- या अँटिबॉडी नाकावाटे श्वसनमार्गात येणाऱ्या कोणत्याही विषाणूचा त्या ठिकाणीच नायनाट करतात.- नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची परिणामकारकता १९६०च्या दशकात निदर्शनास आली होती. पोलिओ डोस नाकावाटे दिला जात होता.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य