शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : धक्कादायक! एकाच सिरिंजने तब्बल 30 विद्यार्थ्यांना टोचली कोरोना लस; उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 14:19 IST

डिस्पोजेबल सिरिंज, जी  केवळ एकदाच वापरली जाते. 1990 च्या दशकापासूनच एचआयव्ही पसरल्यानंतर, डिस्पोजेबल सिरिंज वापरायला सुरुवात झाली आहे.

मध्यप्रदेशातील सागर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे गेल्या बुधवारी लस टोचानाऱ्या जितेंद्र नावाच्या एका व्यक्तीने तब्बल 30 विद्यार्थ्यांना एकाच सिरिंजने लस टोचल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात बोलताना, अधिकाऱ्यांनी केवळ एकच सिरिंज पाठवली होती आणि विभागप्रमुखांनी सर्व मुलांना हिच्या सहाय्याने लसिकरण करण्याचे आदेश दिले होते, असा दावा लसीकरण करणाऱ्या जितेंद्र ने केला. याच बरोबर, आपल्याला त्या अधिकाऱ्याचे नाव माहीत नाही, असेही जितेंद्रने विद्यार्थ्यांच्या पालकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

एकाच सिरिंजने 30 विद्यार्थ्यांना टोचण्यात आली लस -डिस्पोजेबल सिरिंज, जी  केवळ एकदाच वापरली जाते. 1990 च्या दशकापासूनच एचआयव्ही पसरल्यानंतर, डिस्पोजेबल सिरिंज वापरायला सुरुवात झाली आहे. मात्र, संबंधित व्हिडिओमध्ये, 'ज्या व्यक्तीने साहित्य वितरित केले, त्याने केवळ एकच सिरिंज दिली,' असे जितेंद्र बोलत असताना दिसत आहे.

घटनेनंतर चौकशीला सुरुवात - एका पेक्षा अधिक लोकांना इंजेक्शन देताना एकाच सिरिंजचा वापर करू नये, हे आपल्याला माहीत आहे? असे विचारले असता, जितेंद्र म्हणाला, "'हो' मला माहीत आहे. यामुळेच तर मी त्यांना विचारले, की मला केवळ एकाच सिरिंजचा वापर करायचा आहे? यावर ते म्हणाले 'हो'. मग ही माझी चूक कशी? मी तेच केले जे मला सांगण्यात आले होते." यानंतर, सागर जिल्हा प्रशासनाकडून जितेंद्रविरुद्ध हलगर्जीपणा आणि केंद्राच्या 'वन निडल, वन सिरिंज, वन टाईम' नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कोरोना लसीकरण शिबिरादरम्यान घडली घटना -याप्रकरणी लसी आणि इतर काही आवश्यक सामग्री पाठवणाऱ्या प्रभारी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. राकेश रोशन यांच्या विरोधातही विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही घटना सागर शहरातील जैन पब्लिक हायर सेकेंडरी स्कूलमध्ये मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कोरोना लसीकरण शिबिरात घडली. याप्रकरणी प्रभारी कलेक्टर क्षितिज सिंघल यांनी तत्काळ, मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले. चौकशीदरम्यान जितेंद्र उपस्थित नव्हता. तसेच, घटना समो आल्यानंतर त्याचा फोनही स्वीच ऑफ होता, असे सूत्रांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश