शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या तस्करीला कोरोनामुळे लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:07 IST

एप्रिलमध्ये भारतीय विमानतळांवर अवघे २०.६ किलो तस्करीचे सोने पकडले गेले. हा मागील सहा महिन्यांचा नीचांक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे भारतात होणाऱ्या सोन्याच्या तस्करीचे कंबरडे मोडले आहे. कोविड-१९ महामारीपूर्वी महिन्याला सुमारे २५ टन सोने तस्करीच्या मार्गाने भारतात येत होते. त्याचे प्रमाण आता अवघे २ टनांवर आले आहे, असे अखिल भारतीय रत्ने व आभूषणे देशांतर्गत परिषदेचे चेअरमन एन. अनंत पद्मनाभन यांनी सांगितले आहे.

जागतिक सोने परिषदेच्या अंदाजानुसार, गेल्या वर्षी १२० टन सोने तस्करीच्या मार्गाने भारतात आणले गेले होते. भारतातील एकूण वार्षिक मागणीच्या तुलनेत हे प्रमाण १७ टक्के होते.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, आता लॉकडाऊन काळातील निर्बंध हळूहळू उठविले जात असले तरी कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसºया स्थानावर आहे. त्यामुळे भारताने आपल्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत. त्यामुळेही सोने तस्करी नियंत्रणात आहे.पद्मनाभन यांनी सांगितले की, मागील सहा महिन्यांपासून विमानांचे उड्डाण बंद आहे. त्यामुळे हवाईमार्गे होणारी सोने तस्करी जवळपास बंद पडली आहे. खुष्कीच्या मार्गाने नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथून अत्यल्प प्रमाणात तस्करीचे सोने भारतात येत आहे.

सोने वापरण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे येथील सोन्याची मागणीही मजबूत असते. त्याचा लाभ तस्करांना होत असतो; पण आता लॉकडाऊनमुळे मागणीच घटल्याने सोने तस्करीचेही कंबरडे मोडलेआहे.एप्रिलमध्ये भारतीय विमानतळांवर अवघे २०.६ किलो तस्करीचे सोने पकडले गेले. हा मागील सहा महिन्यांचा नीचांक आहे.विमान वाहतूक बंद असल्याचा परिणामच्मार्च महिन्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन, तसेच बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक याचा तस्करीवर मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था डबघाईलाआल्यामुळे सोन्याची मागणीही घटली आहे. त्यामुळेही तस्करीमध्ये घट झाली आहे.

टॅग्स :Goldसोनं