शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

आता घरबसल्या करा कोरोना चाचणी! अवघ्या ३२५ रुपयांत लाँच केली जबरदस्त किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:08 IST

आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनी असलेल्या अॅबॉट (Abbott) कंपनीनं  ज्येष्ठ आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण असणाऱ्यांसाठी घरच्या ...

आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनी असलेल्या अॅबॉट (Abbott) कंपनीनं  ज्येष्ठ आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण असणाऱ्यांसाठी घरच्या घरी कोरोनाची चाचणी (Covid-19 Home-Testing Kit) घेता येईल असं खास किट तयार केलं आहे. या किटची किंमत अवघी ३२५ रुपये इतकी असणार आहे. 

अॅबॉट कंपनीच्या माहितीनुसार येत्या काळात लाखोंच्या संख्येनं कोविड-१९ रॅपिड अँटिजन परिक्षण किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ज्यांचा वापर खासगी स्वरुपात अगदी घरच्या घरी करता येणार आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवरील ओझं कमी होण्यास खूप मोठी मदत होणार आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. या किटच्या माध्यमातून घरच्या घरी कोरोना चाचणी नागरिकांना करता येणार आहे. या टेस्टिंग किटच्या मदतीनं होम आयोलेशनमध्ये वाढ होईल आणि व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल, असं मत आयसीएमआरचे माजी संचालक जनरल निर्मल कुमार गांगुली यांनी व्यक्त केलं आहे. 

कोरोना चाचणीच्या या किटमुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठं यश प्राप्त होईल आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ७० लाख किट दाखल होतील. याशिवाय गरज भासल्यास मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता असल्याचं कंपनीचे आशियाई उपाध्यक्ष संजीव जोहर यांनी सांगितलं. 

किती येईल खर्च?या टेस्ट किटचं नाव अॅबॉट Panbio COVID-19 अँटिजन टेस्टिंग किट असं ठेवण्यात आलं आहे. एका किटची किंमत ३२५ रुपये इतकी असून ४ पॅक किटची किंमत १,२५० रुपये इतकी आहे. तर १० पॅक किटची किंमत २८०० रुपये व २० पॅक किटची किंमत ५४०० रुपये इतकी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या