शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या राज्यातच कोरोना घोटाळा! रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही निगेटिव्ह दाखविले

By हेमंत बावकर | Updated: November 2, 2020 18:32 IST

CoronaVirus News: काही दिवसांपूर्वी थायरोकेअर लॅबच्या सीईओंनीच राज्य सरकारांवर गंभीर आरोप लावले होते.

गुजरातच्या राजकोट आणि जामनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी दाखविण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असले तरीही ते निगेटिव्ह दाखविण्याचा खेळ खेळला जात आहे. आरोग्य विभागाचे अधिकारीच यात गुंतलेले असून त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना निगेटिव्ह दाखविण्याची तंबी कर्मचाऱ्यांना दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी थायरोकेअर लॅबच्या सीईओंनीच राज्य सरकारांवर गंभीर आरोप लावले होते. राज्य सरकारांची बदनामी होईल या भीतीने कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी लपविण्याचे कृत्य करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअर (Thyrocare) ने केले होते. Thyrocare Technologies चे सीईओ वेलुमनी यांनी सांगितले की, काही राज्यांनी थायरोकेअरला सांगितले आहे की, कोरोनाच्या चाचण्या घेऊ नका. तर काही राज्यांनी कोरोना रुग्णांचे आकडे आयसीएमआरला देऊ नयेत किंवा त्यामध्ये हेराफेरी करावी, असे सांगितले आहे. गुजरातमधील हेराफेरीचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. 

यासाठी राजकोट आणि जामनगर भागातील रॅपिड अँटिजन किटद्वारे केलेल्या 3.5 लाख रेकॉर्ड तपासण्यात आली. यापैकी अनेक रुग्णांशी फोनवर संपर्क साधण्यात आला. यामुळे या मोठ्या षडयंत्राचा भांडाफोड झाला आहे. राजकोट मनपा, राजकोटमधील गावे आणि जामनगर या तीन भागातील कोरोना रुग्णांचे आकडे कमी दाखविण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबण्यात आले. यामध्ये पालिका आयुक्तांपासून आरोग्य खात्याचे मोठमोठे अधिकारी सहभागी असल्याचे आढळले आहे. 

990 रुग्णांना निगेटिव्ह दाखविलेजिल्हा आरोग्य कचेरीच्या मेलआयडीवरून जामनगरच्या सर्व हॉस्पिटल अधिकाऱ्यांना मेल करण्यात आला होता. या मेलला जोडलेल्या लिस्टसारखी अँटीजेन निगेटीव्हची नोंद करायची आहे. चुकूनही पॉझिटिव्ह म्हणून कोणाची नोंद होता नये असे आदेश देण्यात आले होते. मेलमध्ये पाठविणाऱ्याचे नाव डॉ. बीपी मणवर असे लिहिण्यात आले होते. यामध्ये 900 कोरोना रुग्णांचे नाव होते. 

राजकोट जिल्ह्यात 5325 पॉझिटिव्ह, दाखविले 3720मनपाच्या तुलनेत जिल्हा आरोग्य विभागाची पद्धत वेगळी आहे. जिल्ह्यात जेवढ्या रुग्णांची चाचणी केली जाते त्यांचे नाव, मोबाईल नंबर रजिस्टर केला जातो. मात्र, ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे लिहिले जात नाही.  मात्र, जेव्हा यादी जाहीर करण्याची वेळ येते तेव्हा अधिकारी रोजची संख्या ठरवितात. अशाप्रकारे राजकोट जिल्ह्यात 5325 पॉझिटिव्ह असताना 3720 दाखविल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरात