शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कोरोनाच्या 'R Value' ने वाढवली चिंता, जानेवारीनंतर पहिल्यांदाच वाढला ग्राफ, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:04 IST

corona : भारतात कोरोनाचा R Value एकापेक्षा जास्त झाली आहे. चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या संशोधकांनी हा अंदाज लावला आहे.

नवी दिल्ली : भारतात जानेवारी महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या (Coronavirus Infection in India) आकडेवारीने चिंता वाढवली आहे. देशात कोरोनाची प्रभावी प्रजनन संख्या म्हणजेच आर व्हॅल्यूचा  (R Value) वाढता दर हा संसर्ग किती वेगाने पसरत आहे, याचे सूचक आहे. भारतात कोरोनाचा R Value एकापेक्षा जास्त झाली आहे. चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या संशोधकांनी हा अंदाज लावला आहे.

दरम्यान, R Value एका पेक्षा जास्त असणे हे सूचित करते की, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. हा दर 1 च्या खाली राहिला तर साथीचे रोग नियंत्रणात राहतील. तसेच, जर हा दर 1 पेक्षा खूपच कमी असेल, तर हे दर्शविते की रोगाचा संसर्ग थांबला आहे. यावर्षी कोरोनाचा R Value ही 1 ते 10 जानेवारी दरम्यान  2.98 वर पोहोचली होती. कारण या काळात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढली होती.

या संशोधकांच्या मते, गेल्या काही आठवड्यांत देशात कोरोनाची R Value झपाट्याने वाढली आहे. 12-18 एप्रिल दरम्यान हा दर 1.07 होती, तर 5-11 एप्रिल दरम्यान  R Value ही 0.93 होती. संस्थेचे संशोधक सीताभ्रा सिन्हा यांच्या मते, 16-22 जानेवारी दरम्यान 1 च्या वर होती. त्यावेळी R Value ही 1.28 होती. सीताभ्रा सिन्हा यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, या दराचे कारण केवळ दिल्लीतील कोरोनाची वाढती प्रकरणे नसून हरयाणा आणि उत्तर प्रदेशशी संबंधित प्रकरणे देखील आहेत.

सीताभ्र सिन्हा यांनी सांगितले की, जवळपास सर्वच प्रमुख शहरे – मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई R Value ही  1 च्या वर आहे. तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये R Value ही  2 च्या वर आहे. सध्या कोलकाता डेटा उपलब्ध नाही. 18 एप्रिल रोजी संपणाऱ्या आठवड्यासाठी अंदाजे R Value दिल्लीसाठी 2.12, उत्तर प्रदेशसाठी 2.12, कर्नाटकसाठी 1.04, हरयाणासाठी 1.70, मुंबईसाठी 1.13, चेन्नईसाठी 1.18 आणि बेंगळुरूसाठी 1.04 आहे. दरम्यान, केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे R Value अनुक्रमे 0.72 आणि 0.88 आहे. सध्या कर्नाटकात  R Value ही 1 पेक्षा जास्त आहे आणि याचे कारण बेंगळुरूमधील वाढती कोरोना प्रकरणे असू शकतात, असे सीताभ्रा सिन्हा यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस