शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांचे होताहेत प्राण्यांपेक्षा भयानक हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 07:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; महाराष्ट्रासहित चार राज्यांना नोटिसा

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांवरील उपचारांत होत असलेल्या हलगर्जीपणाबद्दल, तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांचे मृतदेह नीट ठेवले जात नसल्याच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राण्यांना भोगाव्या लागत नसतील इतक्या हालअपेष्टा या रुग्णांना सोसाव्या लागत आहेत. हे चित्र क्लेशदायी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशा घटनांची सविस्तर माहिती सादर करावी, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांना नोटिसा जारी केल्या.

याबाबतच्या बातम्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दखल घेतली. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारांत जो हलगर्जीपणा सुरू आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक टीका केली. दिल्लीतील रुग्णालयांत गैरव्यवस्थेचे साम्राज्य असून, लोकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाणही खूप कमी आहे. या गोष्टींवर न्यायालयाने बोट ठेवून दिल्ली सरकारला फटकारले. शासकीय रुग्णालयांतील खाटा रिकाम्या असतानाही रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.उत्तम आरोग्य सुविधा सरकारचे कर्तव्यदिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृतदेह जमिनीवर बराच वेळ तसेच ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याची गंभीर दखलही सर्वोच्च न्यायालयाने घेतली. रुग्णालयांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, हे सरकारचे, तर कोरोना रुग्णांची उत्तम सेवा करणे हे आरोग्यसेवकांचे कर्तव्य आहे, याची आठवण न्यायालयाने दिली.युद्धात सैनिकांना नाराज करू नका - सुप्रीम कोर्टयुद्धाच्या काळात आपण सैनिकांना नाराज करू नका. डॉक्टरांच्या तक्रारींवर तोडगा काढा आणि त्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला यावर उपाय करायला सांगितला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई