शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Corona Omicron Varient: 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग, गेल्या 24 तासांत 180 रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 17:58 IST

दिल्लीमध्ये सर्वाधिक 263 रुग्ण असून, महाराष्ट्रात 252 रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात भारतात दररोज सरासरी 8,000 हून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली. एकूणच, कोरोना पॉझिटिव्ह दर 0.92 टक्के आहे. पण, 26 डिसेंबरपासून देशात दररोज 10,000 रुग्णांची नोंद होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मिझोराममधील 6 जिल्हे, अरुणाचल प्रदेशातील एक जिल्हा, पश्चिम बंगालमधील कोलकाता यासह 8 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी दर नोंदवला जात आहे. 

लव अग्रवाल पुढे म्हणाले, भारतात कोरोनाव्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकाराची 961 प्रकरणे आहेत, त्यापैकी 320 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील सुमारे 90 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. याशिवाय पात्र वृद्ध लोकसंख्येला एसएमएस पाठवून 10 जानेवारीपासून प्रीकॉशनरी डोस घेण्यास सांगितले जाणार आहे.

मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी प्रीकॉशनरी डोस

आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, सर्व लसी भारत, इस्रायल, अमेरिका, युरोप, ब्रिटन किंवा चीनमधील आहेत. त्यांचे काम प्रामुख्याने रोगप्रतिकार शक्ती तयार करणे आहे. या लसी संक्रमणावर आळा घालत नाहीत. प्रीकॉशनरी डोस हे प्रामुख्याने संसर्गाची तीव्रता, हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू कमी करण्यासाठी आहेत.

ओमायक्रॉनची 180 नवीन प्रकरणे

गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूच्या नवीन ओमायक्रॉन प्रकाराची 180 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह देशातील एकूण ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या 961 वर पोहोचली आहे. ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 961 पैकी 320 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. 

या राज्यात सर्वाधिक रुग्णकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यात दिल्लीमध्ये सर्वाधिक 263 रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात 252, गुजरातमध्ये 97, राजस्थानमध्ये 69, केरळमध्ये 65 आणि तेलंगणामध्ये 62 रुग्ण आढळले आहेत.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या 82,402मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोविड-19 चे 13,154 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील संक्रमितांची संख्या 3,48,22,040 झाली आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या 82,402 पर्यंत वाढली आहे. तर, 268 बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,80,860 गेली आहे. देशात 49 दिवसांनंतर कोविड-19 चे दररोज 13 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 11 नोव्हेंबर रोजी 24 तासांत संसर्गाचे 13,091 नवीन रुग्ण आढळले होते. आकडेवारीनुसार, देशात सलग 63 दिवस कोविड-19 चे दैनंदिन रुग्ण 15 हजारांपेक्षा कमी आहेत. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या