शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाच्या JN.1 नवीन व्हेरिएंटचे 109 रुग्ण; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 17:55 IST

Corona Virus : JN.1 सब व्हेरिएंट सर्वप्रथम ऑगस्टमध्ये ओळखला गेला. हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2.86 पासून तयार झाला आहे.

देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 चे 529 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशभरात एक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,093 झाली आहे. मंत्रालयाने सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन रुग्ण कर्नाटकातील तर एक रुग्ण गुजरातचा आहे.

दरम्यान, कोरोनाचा सब व्हेरिएंट JN.1 च्या 40 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 26 डिसेंबरपर्यंत देशभरातील नवीन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 109 वर पोहोचली होती. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीत असं म्हटलं आहे की, गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34 आणि गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4 आणि तेलंगणामध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. सब व्हेरिएंटचे रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.

JN.1 सब व्हेरिएंट सर्वप्रथम ऑगस्टमध्ये ओळखला गेला. हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2.86 पासून तयार झाला आहे. 2022 च्या सुरुवातीला, BA.2.86 हे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण होते. BA.2.86 मोठ्या प्रमाणावर पसरला नाही, परंतु तज्ञांची चिंती वाढली कारण BA.2.86 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्यूटेशन्स होते आणि तशाच प्रकारे JN.1 च्या  स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्यूटेशन्स आहेत. 

तज्ज्ञांचे  म्हणणे आहे की, जागतिक स्तरावर रुग्णांमध्ये झालेली वाढ हे सूचित करते की JN.1 – Omicron चा सब व्हेरिएंट आहे जो मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्यांना देखील सहजपणे संक्रमित करू शकतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने याचे वर्णन यूएसमध्ये सर्वात वेगाने वाढणारा व्हेरिएंट म्हणून केलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या