शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

देशात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; दोन हजार नवे रुग्ण; उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत मास्क सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 11:01 IST

उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ११५४२वर आली आहे. गेल्या चोवीस तासांत २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली : कोरोना आता नावापुरता शिल्लक आहे अशा थाटात सर्वत्र गर्दी करून वावरणाऱ्या नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे. देशात दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असून, गेल्या चोवीस तासांत नवे २१८३ नवे रुग्ण आढळले आहेत. उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत मास्क वापरणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले आहे.

- उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ११५४२वर आली आहे. गेल्या चोवीस तासांत २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

उत्तर प्रदेश -नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर)मधील गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत हे सहा व लखनऊ अशा ७ जिल्ह्यांत मास्क वापरणे सरकारने सोमवारपासून बंधनकारक केले.

हरयाणा -गुरुग्राम, फरिदाबाद, सोनिपत, झज्जर या जिल्ह्यांमध्ये मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. सोमवारी २३४ नवे रुग्ण आढळले. 

९०% काेराेना रुग्णवाढ एकाच दिवसात-  देशात १६ एप्रिलपेक्षा १७ एप्रिलला कोरो ना रुग्णांच्या संख्येत सुमारे ९०% वाढ झाली. -  याच प्रमाणात रुग्ण संख्या वाढत राहिली तर शिथिल केलेले कोरोना निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील अशी चिन्हे आहेत.  केंद्र व राज्य सरकारे कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

ओमायक्रॉनने मुलांच्या आरोग्याला धोका-  ओमायक्रॉनमुळे लहान मुलांमध्ये श्वसननलिकेच्या वरच्या भागातील संसर्गाचे (यूएआय) विकार उद्भवू शकतात. -  त्यामुळे त्यांना हृदयविकार, तसेच इतर आजारांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे असे कोलोरॅडो विद्यापीठ, स्टोनी ब्रूक विद्यापीठाने केलेल्या संयुक्त पाहणीत आढळून आले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणा