कोरोना : जगभरात ९५००० लोकांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 03:47 AM2020-03-06T03:47:37+5:302020-03-06T03:47:50+5:30

चीननंतर दक्षिण कोरियात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे ५७६६ रुग्ण आढळले आहेत, तर देशात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये १०० जणांचा बळी गेला आहे, तर ३००० हून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

Corona: Infects 19 people worldwide | कोरोना : जगभरात ९५००० लोकांना संसर्ग

कोरोना : जगभरात ९५००० लोकांना संसर्ग

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा संसर्ग ८० देशांत झाला असून जगातील मृत्यूंची संख्या ३२८० झाली आहे, तर ९५,४०० लोकांना संसर्ग झाला आहे. चीनमधील बळींची संख्या ३०१२ वर पोहोचली असून ८०,४०९ लोकांना याचा संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, या विषाणूंमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे ३.४ टक्के आहे. सार्समध्ये मृत्यूचे प्रमाण १० टक्के होते, तर हवामानाप्रमाणे होणाऱ्या फ्लूमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.१ टक्के आहे.
चीननंतर दक्षिण कोरियात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे ५७६६ रुग्ण आढळले आहेत, तर देशात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये १०० जणांचा बळी गेला आहे, तर ३००० हून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे.
दोन प्रकारचे कोरोना विषाणू?
संशोधकांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणू दोन प्रकारचे आहेत. चीनच्या वुहानमध्ये ७० टक्के आक्रमक प्रकारचा विषाणू, तर ३० टक्के हा कमी आक्रमक विषाणू दिसून आला आहे.
>अमेरिकेत बळींची संख्या ११
अमेरिकेत कोरोनाच्या बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे. कॅलिफोर्नियात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून वॉशिंग्टनच्या बाहेरचा हा पहिला मृत्यू
आहे. आतापर्यंत अमेरिकेत १३० लोकांना संसर्ग झाला आहे. १२ पेक्षा अधिक राज्यांत या विषाणूंचे रुग्ण आढळून आले आहेत. बहुतांश मृत्यू वॉशिंग्टनमध्ये झाले आहेत.
>कोरोना आणि जागतिक अर्थशास्त्र
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) २०१९ मधील २.९ टक्के या दरापेक्षा २०२० साठी कमी वाढीचा दर दर्शविला आहे.
जानेवारीमध्ये आयएमएफने ३.३ टक्के एवढा विकास दराचा अंदाज वर्तविला होता. कारण, त्यावेळी अमेरिका- चीनमधील व्यापार तणाव कमी झाला होता.
आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाले की, २००८ च्या आर्थिक संकटानंतरची ही सर्वांत संथ गती असू शकेल.
>केरळने काय केली आहे उपाययोजना?
विदेशातून आलेल्या प्रवाशांना हेल्थ कार्ड दिले जाईल. त्यात त्यांना प्रवासाचा व स्वत:च्या आरोग्याचा तपशील द्यावा लागतो.
केरळमधील पाचही विमानतळे ही रुग्णवाहिकेने सर्व जिल्हा रुग्णालयांशी जोडली गेलेली आहेत.
कोणत्याही प्रवाशाला ताप, खोकला असेल तर तातडीने त्याला तातडीने या लिंकड जिल्हा रुग्णालयात हलवले जाते.विषाणूची बाधा झालेल्या ठिकाणांहून येणाºया प्रवाशांची यादी करण्याचे तसेच विषाणूची बाधा झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी बनवण्याचे ग्रामपंचायतींना आदेश.

Web Title: Corona: Infects 19 people worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.