शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोना, भाजपाचे डझनभर तर एक शिवसेनेचा नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 15:33 IST

अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार, खासदारांची टेस्ट घेतली असता, त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे

ठळक मुद्देकोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार असून त्यांची संख्या बारा आहे. वायएसआर काँग्रेसच्या 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची लागण झाली आहे

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, त्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यातच आज कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या तब्बल 17 खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. कोरोनामुळे सध्या सभागृहांचे कामकाज रोज चारच तास चालणार आहे.  

अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार, खासदारांची टेस्ट घेतली असता, त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.  कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार असून त्यांची संख्या बारा आहे. वायएसआर काँग्रेसच्या 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे. 

केंद्रीय मंत्र्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत असून त्यातील काही मंत्र्यांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत. अधिवेशन सुरू होण्याच्या ३ दिवस आधी खासदारांना कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांना सांगण्यात आले होते. अधिवेशनाआधीची सर्वपक्षीय बैठक कोरोना साथीमुळे यंदा रद्द करण्यात आली. बैठकीची संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारी केली होती. कोरोना साथीमुळे प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरेही लेखी स्वरूपात दिली जातील. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने राज्यसभा चेंबर, गॅलरी, लोकसभा चेंबर येथे खासदारांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज व सदस्याचे भाषण नीट ऐकता यावे यासाठी दोन्ही सभागृहांच्या गॅलरीमध्ये स्क्रीन लावण्यात आले आहेत.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे. तर,

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMember of parliamentखासदार