शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर कोरोना महामारीचे सावट, खासदारांना हवे व्हर्च्युअल अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:37 IST

winter session of Parliament : अनेक खासदारांनी आमच्या जीविताची जोखीम घेतली जाऊ नये, असे राज्यसभा व लोकसभेच्या अध्यक्षांना सांगितले आहे.

 - हरीश गुप्ता

नवी दिल्ली : कोरोना महामारी अजून संपलेली नसल्यामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्याचा फेरविचार करणे सरकारला भाग पडले आहे. काही मंत्री आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकया नायडू यांच्यासह ४५ खासदारांना सप्टेंबरमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोरोनाची बाधा झाली होती. एका केंद्रीय मंत्र्याचे तर कोरोनामुळे निधनही झाले. पावसाळी अधिवेशन २८ सप्टेंबर रोजी संपलेले असल्यामुळे सरकारवर हिवाळी अधिवेशन घेणे घटनात्मक किंवा कायद्याने बंधनकारक नाही. दोन अधिवेशनांत सहापेक्षा जास्त महिन्यांचे अंतर असायला नको. त्यामुळे पुढील अधिवेशन सरकार मार्चमध्येही घेऊ शकेल; परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३० जानेवारी रोजी सुरू होणे बंधनकारक आहे. कोरोनाची साथ अजून असल्यामुळे सरकार खासदारांच्या जीविताबाबत धोका पत्करू शकत नाही.सरकारमधील उच्च सूत्रांनी म्हटले की, या विषयातून कसा मार्ग काढता येईल यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकया नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसेच मुख्य विरोधी पक्षासोबत चर्चा सुरू करण्याचा विचार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो, यावर हिवाळी अधिवेशनाचा संबंध असल्याच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तांचा या सूत्रांनी इन्कार केला. एखाद्या राज्याच्या निवडणुकीचा निकाल संसदेचे अधिवेशन कसे निश्चित करू शकतो, असा प्रश्न त्यांनी विचारला.

मंत्रिमंडळ समिती घेणार निर्णयअनेक खासदारांनी आमच्या जीविताची जोखीम घेतली जाऊ नये, असे राज्यसभा व लोकसभेच्या अध्यक्षांना सांगितले आहे. संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन घेतले जावे, असे आवाहन खासदार करत आहेत. सप्टेंबरमध्ये पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला होता व ते प्रत्यक्ष घेतले गेले होते. संसदीय कामकाज मंत्रालयाकडून प्रेझेंटेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ समिती (संसदीय कामकाज) अंतिम निर्णय घेईल.

टॅग्स :Parliamentसंसदcorona virusकोरोना वायरस बातम्या